महापालिका निवडणूका : भाजप, राष्ट्रवादी आणि काँग्रेसशी टक्कर घेणे तर दूरच; ठाकरे गटापुढे शिंदे गटाचेच आव्हान मोठे!!


नाशिक : शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर महाराष्ट्राचे जे राजकीय चित्र निर्माण झाले आहे त्यामध्ये प्रामुख्याने शिवसेनेच्या बाबतीत एक फार मोठा चिंतेचा विषय तयार झाला आहे, तो म्हणजे काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्याशी टक्कर घेणे तर दूरच, पण माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतल्या गटापुढे शिवसेनेतल्याच दुसऱ्या एकनाथ शिंदे यांच्या गटाचे प्रचंड मोठ्या आव्हान उभे राहिले आहे. मग शिवसेना नेमकी ठाकरे गटाची गुरु अथवा शिंदे गटाची हे आव्हान कायम असणार आहे!!Municipal elections: A clash with BJP, NCP and Congress is far off; The Shinde group has a big challenge before the Thackeray group!!

 16 महापालिकांमध्ये आव्हान

शिवाय हे आव्हान फक्त मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीपुरतेच मर्यादित नसून महाराष्ट्रातील 16 महापालिकांमध्ये असेच आव्हान उभे राहिले आहे. शिवसेनेतली ही फुट केवळ 40 आमदारांपुरती मर्यादित न राहिल्याने आणि ती अक्षरशः तळागाळापर्यंत पोहोचलेली असल्याने ही राजकीय अवस्था निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदी असताना महाविकास आघाडीतला तो शिवसेना हा सर्वात मोठा घटक पक्ष होता. तर एकूण राज्याची परिस्थिती पाहता आमदारांच्या संख्येत तो क्रमांक दोनचा पक्ष होता. पण एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेतला ठाकरे गट हा महाराष्ट्रातल्या पाचव्या नंबरचा पक्ष बनला आहे. कारण त्या गटाकडे सध्या फक्त 16 आमदार आहेत. याचा अर्थ काँग्रेसपेक्षाही ठाकरे गटाची अवस्था दारूण झाली आहे. कारण काँग्रेसचे 44 आमदार आहेत आणि राष्ट्रवादीचे 53 आमदार असल्यामुळे सध्या राष्ट्रवादी काँग्रेस भाजप खालोखालचा दुसऱ्या नंबरचा पक्ष बनला आहे. शिंदे गटाकडे 40 आमदार + 12 अपक्ष असल्याने हा गट तिसऱ्या नंबरचा पक्ष बनला असून या गटानेच शिवसेनेच्या ठाकरे गटापुढे प्रचंड मोठे आव्हान उभे केले आहे. हे आव्हान उमेदवार निवडीपासून ते प्रत्यक्ष निवडून येईपर्यंत कायम असणार आहे.



 राष्ट्रवादीशी आघाडीचा मनसूबा टिकेल?

महाविकास आघाडीत राहूनही शिवसेना महापालिका निवडणुकीत फारतर राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करून निवडणूक लढवण्याचा मनसुबा रचत होती. काँग्रेसला त्यांना अलख थलगच पाडायचे होते. पण आता परिस्थिती 360 अंशात बदलली असून काँग्रेस – राष्ट्रवादीशी टक्कर घेणे तर सोडाच उलट ठाकरे गटापुढे प्रत्येक महापालिका निवडणुकीत शिंदे गटाचे आव्हान उभे राहिल्याने थेट राजकीय अस्तित्वाचा ठळक प्रश्न निर्माण झाला आहे.

मावळत्या नगरसेवकांचा कल शिंदे गटाकडे

सध्या जरी सर्व महापालिका बरखास्त झाले असल्या तरी त्यातले शिवसेनेचे नगरसेवक हळूहळू शिंदे गटाला येऊन मिळत आहेत आणि शिंदे गटाकडे ठाकरे गटापेक्षा इच्छुकांची संख्याही वाढली आहे. यातूनच खऱ्या अर्थाने शिवसेनेत नुसती उभी फूट नसून अक्षरशः राजकीय फाळणी झाल्याचे चित्र उभे राहिले आहे आणि हेच नेमके ठाकरे गटासाठी प्रचंड मोठे आव्हान आहे.

राष्ट्रवादी स्वतःच्या टम्स अँड कंडिशन्स

ठाकरे गट स्वतःच्या राजकीय अस्तित्वासाठी असा झुंजत असताना आता शरद पवारांच्या राष्ट्रवादीला देखील राजकीय अर्थाने ठाकरे गटाची महापालिका निवडणुका लढवताना गरज उरलेली नाही. किंबहुना राजकीय वाटाघाटींमध्ये ठाकरे गटाची न्यूसन्स व्हॅल्यू देखील तेवढी उरलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेनेचे ठाकरे गटाबरोबर आघाडी केलीच तर ती राष्ट्रवादी स्वतःच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर करेल आणि इथेही ठाकरे गटाला तडजोड करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. आणि त्याचा राजकीय फटका बसल्याशिवाय राहणार नाही. कारण अशा तडजोडीतून ठाकरे गटाचे जे काही उमेदवार निवडून येतील त्यांची ठाकरे गटात कायम राहण्याची शाश्वती देखील नेमके कोण देऊ शकेल?

हा प्रश्न महापालिका निवडणुका झाल्यानंतर नजीकच्या भविष्यात उपस्थित होण्याची सर्वाधिक दाट शक्यता आहे. ज्या शिवसेनेच्या तिकिटावर आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली 56 आमदार निवडून आले, त्यापैकी 40 आमदारांनी उद्योग ठाकरे यांच्या राष्ट्रवादीशी आघाडी करण्याच्या निर्णयाच्या एका मुद्द्यावर त्यांच्यापासून फारकत घेतली तशी फारकत शिवसेनेच्या ठाकरे गटाचे उमेदवार महापालिका निवडणुकीत निवडून आल्यानंतर घेणारच नाहीत याची कोण शाश्वती देणार??, हा मूलभूत प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर आज तरी ठाकरे गटाकडे असेल असे वाटत नाही.

 आमदार, खासदार, नगरसेवक फुटले

शिवसेनेतून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदार व १४ खासदारांसह स्वतंत्र गट फुटल्यानंतर ठाण्यासह इतर जिल्ह्यांमधून शिवसेनेचे पदाधिकारी फुटून शिंदे यांच्या बाळासाहेब शिवसेना गटात सामील व्हायला लागले आहेत. मुंबईतील खासदार,आमदारांसह माजी नगरसेवक सुद्धा शिंदे गटात सामील व्हायला लागले असून, याचा परिणाम काही प्रमाणात मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत दिसून येणार आहे.

 मुंबईत शिंदे गटाचे वर्चस्व वाढणार

शिवसेनेतून एकनाथ शिंदे यांच्यासह खासदार,आमदार आणि पक्षाचे पदाधिकारी फुटून बाळासाहेब शिवसेना गटाची स्थापना केली. परंतु मुंबईच्या बाहेरील शहरांमध्ये आणि जिल्ह्यांमधून पदाधिकारी एकनाथ शिंदे यांच्या गटात फुटून जात असले, तरी मुंबईमधील पदाधिकाऱ्यांना फोडण्यात त्यांना अद्याप यश आलेले नाही. मुंबईतील खासदार राहुल शेवाळे यांच्यासह सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव व दिलीप लांडे आदी आमदार फुटून गेले. महापालिका निवडणूक जवळ येताना आणि प्रत्यक्ष जाहीर झाल्यानंतर शिवसेनेतील ठाकरे गटाचे अधिक पदाधिकारी फुटून शिंदे गटात सामील होतील, अशी दाट शक्यता आहे.

शेवाळे समर्थक शिंदे गटात

पण सद्यस्थितीत शेवाळेंच्या लोकसभा मतदार संघात जे शिवसेना नगरसेवक आहेत त्यातील एकमेव वैशाली शेवाळे या त्यांच्यासोबत जाऊ शकतात. याशिवाय माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, समाधान सरवणकर हे शिंदे गटासोबत गेले आहेत. परंतु पहिला अधिकृत शिंदे गटातील प्रवेश दहिसरमधील माजी नगरसेविका शितल म्हात्रे यांनी केला असून, दोनच दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मालाड येथील माजी नगरसेविका धनश्री भरडकर आणि त्यांचे पती यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र, यातील प्रकाश सुर्वे आणि दिलीप लांडे यांच्या विधानसभा क्षेत्रातील तसेच संपर्कातील काही माजी नगरसेवक लवकरच शिंदे गटात सामील होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

शिंदे मुंबईत वजन वाढवणार?

मुंबई ही ठाकरेंची असल्याने आजवर शिंदे यांनी कधीही मुंबईत लक्ष घातले नव्हते आणि ठाकरेंनीही बाहेरच्या कुणा नेत्यावर मुंबईची जबाबदारी सोपवली नव्हती. कोविड काळात नगरविकास खात्याचा पदभार सांभाळणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्याकडे मुंबई महापालिकेची जबाबदारी सोपवली जाण्याची शक्यता होती. परंतु ठाकरे यांनी शिंदे यांच्याकडे महापालिका सोपवली नाही. त्यामुळे मुंबई महापालिकेकडे लक्ष घालण्याची संधीही हुकली. त्यामुळे शिंदे यांचे वजन मुंबई वगळता इतर जिल्ह्यांमध्ये असल्याने त्यांना मुंबईतील पदाधिकारी फोडण्यात किंवा पक्षाने हकालपट्टी केल्यानंतर ठाण्याप्रमाणे त्यांचे पद कायम ठेवण्याचा प्रयत्न करता आलेला नाही.

ठाकरेंना बसणार फटका?

मुंबई महापालिकेच्या मागील निवडणुकीत शिवसेनेचे एकूण ८४ नगरसेवक निवडून आले. परंतु पुढे मनसेचे सहा नगरसेवक पक्षात घेतल्याने ही संख्या ९० वर पोहोचली. याशिवाय अपक्षांनी दिलेला पाठिंबा आणि जात प्रमाणपत्र पडताळणीत नगरसेवक अपात्र ठरल्याने दुसऱ्या क्रमांकावरील शिवसेना उमेदवार विजयी झाल्याने ही संख्या वाढून एकूण शिवसेनेच्या नगरसेवकांची संख्या ९७ एवढी झाली आहे. परंतु या ९७ नगरसेवकांपैकी भविष्यात शिवसेनेला ४० माजी नगरसेवकांचा फटका बसू शकतो. त्यामुळे आजवर जे शिवसेनेच्या तिकीटावर पण स्वत:च्या नावावर निवडून येतात अशाप्रकारचे संभाव्य उमेदवार पक्ष सोडून गेल्यास याचा फटका ठाकरे यांच्या शिवसेनेला बसण्याची शक्यता आहे.

 मनसे पेक्षाही शिंदे गट प्रभावी

पण शिंदे यांचे मुंबईत वर्चस्व नसले, तरी राज्याचे मुख्यमंत्री पद असल्याने त्यांच्या बाळासाहेब शिवसेना गटाला आगामी निवडणुकीत मनसेपेक्षा जास्त जागा निवडून आणता येऊ शकतात,असे चित्र सध्याच्या परिस्थितीवरून पहायला मिळत आहे. तसे झाल्यास ठाकरे यांच्या शिवसेनेचा सामना भाजप ऐवजी शिंदे यांच्या गटाच्या उमेदवारांशीच होताना दिसेल. त्यातच पुन्हा एकदा २२७ प्रभाग संख्या केल्याने शिवसेनेच्या सर्व विद्यमान माजी नगरसेवकांचे प्रभाग शिंदे गटाच्या हिटलिस्टवर असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे शिंदे गट आता कुणाला गळाला लावून ठाकरे यांच्या शिवसेना उमेदवारांसमोर आपला उमेदवार देतात याकडे सर्वांचे लक्ष आहे.

Municipal elections: A clash with BJP, NCP and Congress is far off; The Shinde group has a big challenge before the Thackeray group!!

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात