राज्यात 1 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात आल्या, मात्र मुंबई महापालिकेनं शाळा सुरु करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता… MUMBAI SCHOOLS REOPEN: The school bell will ring from today! Mumbai with Thane; School in Navi Mumbai starts; School in Pune from tomorrow
विशेष प्रतिनिधी
मुंबई : दिवाळीनंतर राज्य सरकारने राज्यातील 1ली ते 7वी वर्गाच्याही शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, कोरोनाचा नवीन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर मुंबईसह राज्यातील काही ठिकाणी महापालिका प्रशासनाने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. मुंबई महापालिकेनं 15 डिसेंबरपासून शाळा सुरू करण्यात येतील असं सांगितलं होतं. त्यानुसार आजपासून (15 डिसेंबर) मुंबईतील 1ली ते 7वीच्या शाळा सुरू होत आहेत.
दक्षिण आफ्रिकेत कोरोनाचा ओमिक्रॉन व्हेरिएंट आढळून आल्यानंतर मुंबई महापालिकेनं 1ली ते 7वीचे वर्ग शाळेत भरवण्याचा निर्णय पुढे ढकलला होता. खबरदारीची बाब म्हणून महापालिकेच्या शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला होता. त्यानंतर मुंबई ओमिक्रॉन व्हेरिएंटचा संसर्ग झालेले रुग्णही आढळून आले. त्यामुळे शाळा सुरू होतील की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता.
अखेर महापालिका प्रशासनाने 1ली ते 7वीच्या वर्गात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या पालकांच्या मनातील शंका दूर केली आहे. निर्णयाप्रमाणे आजपासून 1ली ते 7वीच्या शाळा सुरू होत आहेत. याबद्दल महापालिकेने ट्विटर हॅण्डलवरूनही माहिती दिली आहे.
दिनांक १५ डिसेंबर, २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या, इयत्ता पहिली ते सातवी च्या शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी कोविड विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन! https://t.co/jajgSW9dBf pic.twitter.com/ewfjprtdfm — माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 14, 2021
दिनांक १५ डिसेंबर, २०२१ पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या, इयत्ता पहिली ते सातवी च्या शाळा सुरू होत आहेत.
विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी कोविड विषयक सूचनांचे पालन करावे असे आवाहन! https://t.co/jajgSW9dBf pic.twitter.com/ewfjprtdfm
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) December 14, 2021
’15 डिसेंबर 2021 पासून बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व व्यवस्थापनांच्या व सर्व माध्यमांच्या, इयत्ता पहिली ते सातवीच्या शाळा सुरू होत आहेत. विद्यार्थी, पालक व शिक्षक यांनी कोविड विषयक सूचनांचे पालन करावे,” असं आवाहन महापालिकेच्या शिक्षण विभागाने केलं आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App