Mumbai Sakinaka Rape : मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रात 77 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात दाखल केले आहे. Mumbai Sakinaka Rape Mumbai Police filed charge sheet in 18 days
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुंबईसह देशभरात खळबळ उडववणाऱ्या साकीनाका बलात्कार आणि हत्या प्रकरणात मुंबई पोलिसांनी 18 दिवसांत तपास पूर्ण करत आरोपपत्र दाखल केले आहे. 346 पानांच्या या आरोपपत्रात 77 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. मुंबई पोलिसांनी हे आरोपपत्र दिंडोशी न्यायालयात दाखल केले आहे.
साकीनाका येथे 32 वर्षीय महिलेवर बलात्कार आणि हत्या झाल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या बलात्काराची तुलना दिल्लीच्या ‘निर्भया’ प्रकरणाशी करण्यात आली. याप्रकरणी तत्काळ कारवाई करत पोलिसांनी काही तासांतच आरोपी मोहन चौहानला अटक केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या घटनेनंतर आश्वासन दिले होते की, पोलीस एका महिन्यात तपास पूर्ण करतील आणि दोषीला लवकरात लवकर शिक्षा व्हावी यासाठी खटला जलदगती न्यायालयात चालवला जाईल. मुंबई पोलिसांनी 30 दिवसांऐवजी 18 दिवसांत तपास पूर्ण केला असून आरोपपत्र दाखल केले आहे.
आरोपींनी रागाच्या भरात हे नृशंस कृत्य केल्याचे पोलिसांना त्यांच्या तपासात आढळले. पीडित महिला आणि आरोपी एकमेकांना ओळखत होते. त्यांचे जवळचे नातेही होते. परंतु दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न केल्यामुळे आरोपी संतापला. घटनेपूर्वी आरोपीने महिलेला भेटण्याचा प्रयत्न केला. त्याने 25 दिवसांपूर्वी पीडितेशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क होऊ शकला नाही. बऱ्याच प्रतीक्षेनंतर जेव्हा ती त्याला भेटली तेव्हा त्याने संतापाच्या भरात हे घृणास्पद कृत्य केले. या घृणास्पद कार्यात त्याने लोखंडी रॉडचाही वापर केला. पोलिसांनी आरोपपत्रात असे लिहिले आहे की, आरोपींनी असे मुद्दाम करण्याचा विचार केला नव्हता. त्याने जे केले आहे, त्याने रागाच्या भरात केले आहे. आतापर्यंत आरोपीच्या वतीने वकील पत्र घेण्यासाठी एकही वकील पुढे आलेला नाही.
9-10 तारखेच्या मध्यरात्री 2.45 च्या सुमारास, 32 वर्षीय महिलेवर आरोपी मोहन चौहानने साकीनाका येथील खैराणी रोडजवळ बलात्कार केला. बलात्कारानंतर त्याने निर्दयीपणे महिलेला लोखंडी रॉडने मारले आणि रॉड गुप्तांगात घातला. 3 ते 3.15 च्या सुमारास जवळच्या एका कंपनीच्या चौकीदाराने पोलिसांना माहिती दिली. पोलीस तेथे पोहोचले आणि महिलेला रुग्णालयात दाखल केले. दुसऱ्या दिवशी दुपारी 12 वाजता अतिरक्तस्त्रावामुळे पीडितेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
Mumbai Sakinaka Rape Mumbai Police filed charge sheet in 18 days
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App