मुंबई दंगल १९९२ – ९३ ते अमरावती दंगल २०२१ ; शिवसेना बदलली ३६० अंशात!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात हिंदू – मुसलमान वाद आणि दंगलीसंदर्भात शिवसेनेची भूमिका नेहमीच चर्चेचा विषय राहिली आहे. 1992 – 93 च्या दंगलीत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी सामनातून जी आवाहने केली होती त्यानुसार शिवसैनिकांनी मुंबई दंगलीत हिंदूंची बाजू उचलून धरली होती.Mumbai riots 1992 – 93 to Amravati riots 2021; Shiv Sena changed to 360 degrees

बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळी शिवसैनिकांना आणि हिंदूंना आदेश दिले होते, “भेकडा सारखे मरू नका मर्दासारखे लढा!!” त्यानंतर शिवसैनिक हिरीरीने हिंदूंच्या बचावासाठी पुढे आले होते. बाळासाहेबांच्या त्यानंतरच्या अनेक भाषणांमध्ये याचा उल्लेख आहे आणि त्याचे व्हिडिओ देखील उपलब्ध आहेत.त्यावेळी महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि लोकसभेचे शिवसेनेचे नेते मधुकर सरपोतदार यांच्यावर दंगल काळात शिवसैनिकांना शस्त्रास्त्रे वाटल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.

मुंबईत राधाबाई चाळ पेटली आणि दंगल फिरली. हिंदूंच्या रक्षणासाठी शिवसैनिक पुढे सरसावला आहे, असे त्यावेळी बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते.

त्यावेळी मुख्यमंत्री शरद पवार यांनी नेमलेल्या न्यायमूर्ती श्रीकृष्ण आयोगाने शिवसेनेवर दंगलीत सामील झाल्याचा ठपका ठेवला होता. परंतु, 1995 नंतर शिवसेना-भाजप युतीच्या मुख्यमंत्री मनोहर जोशी – उपमुख्यमंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सरकारने तो अहवाल फेटाळून लावला होता.

 2012 रझा अकादमीची दंगल

आसाम आणि म्यानमार मध्ये मुसलमानांवर अत्याचार होत आहेत, असा आरोप करून रझा अकादमीने 11 ऑगस्ट 2012 या दिवशी मुंबईत आझाद मैदानावर धुडगुस घातला होता. पोलीस मेमोरियलला रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांनी लाथा मारल्या होत्या.

इतकेच नाही तर काही कोटी रुपयांची संपत्ती या दंगलीमुळे नष्ट झाली होती. त्यावेळी शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून रझा अकादमीच्या दंगलीची तुलना 26 /11 च्या मुंबई हल्ल्याची करून त्यावेळेच्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारवर जबरदस्त तडाखे लावण्यात आले होते. रझा अकादमीची विषवल्ली उखडून टाकण्याची भाषा वापरण्यात आली होती.

तिथपासून ते 2021 च्या आजच्या अमरावती दंगली पर्यंत शिवसेनेची भूमिका आता 360 औषध अंशात बदलल्याचे दिसून येत आहे.सीएए आणि एनआरसी कायद्यांच्या विरोधात रझा अकादमीने आयोजित केलेल्या मेळाव्याला आणि आंदोलनाला शिवसेना प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली होती, एवढेच नाही तर रझा अकादमीच्या एका कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते

या कार्यक्रमाचे फोटो सोशल मीडियावर अनेकांनी शेअर केले आहेत.

त्यानंतर आता रझा अकादमीने अमरावती, मालेगाव, नांदेड, भिवंडी आदी शहरांमध्ये काढलेल्या दंगलींच्या मुद्द्यावर शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. त्यांनी रझा आदमीला भाजपचे पिल्लू असे संबोधले आहे.

संजय राऊत यांनी त्यांनी अमरावती दंगलीचा ठपका भाजपवर ठेवला आहे. त्याच वेळी महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेचे निमित्त करून भाजप व राष्ट्रपती राजवट आणू इच्छित आहे तो प्रयत्न आम्ही मोडून काढू असा इशाराही त्यांनी दिला आहे.

13 राज्यांमधल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपचा पराभव झाल्याने त्यांचे नेते खवळले आहेत. आता हिंदू – मुसलमान वाद पेटवून दंगली घडविण्याचे त्यांचे षडयंत्र आहे. यातूनच अमरावती सारख्या शहरांमध्ये दंगली घडले आहेत, असा आरोपही त्यांनी संजय राऊत यांनी केला आहे.

2012 च्या दंगलीच्या वेळी विषवल्ली वाटणारी रझा अकादमी आता संजय राऊत यांना भाजपचे पिल्लू वाटत आहे. हा शिवसेनेच्या भूमिकेतला 360 अंशांमधला बदल आहे.

Mumbai Riots 1992 – 93 To Amravati Riots 2021; Shiv Sena Changed To 360 Degrees

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण