प्रतिनिधी
मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी मशिदींवरील भोंग्यांचे आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा दिला. धार्मिक व जातीय सलोखा बिघडेल, अशी कोणतीही घटना घडल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे आदेश स्थानिक पोलिसांना दिल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्यासह सह पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी शहरातील मशिदी, हिंदू मंदिरे, जैन मंदिरे, चर्च आणि गुरूद्वारा अशा स्थळांच्या साधारण १०० प्रतिनिधी, सर्व धर्मांच्या धर्मगुरूंची बैठक घेतली. या बैठकीत तक्रार आल्यास कारवाई करू, असा इशाराही आयुक्तांनी यावेळी दिला. Mumbai Police Commissioner warns all religious leaders
तसेच या बैठकीत पुन्हा एकदा सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत माहिती देत धार्मिक स्थळांवरील भोंग्यांचा आवाज ५५ डेसिबलपेक्षा कमी ठेवण्याच्या सूचना केल्यात. धर्मगुरूंकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करूच, पण घरातील मिक्सरचा आवाज ५० ते ५५ डेसिबल असतो, त्यामुळे याचा विसर होण्याची शक्यता असल्याचे एका धार्मिक स्थळाच्या प्रतिनिधीने सांगितले.
पोलीस आयुक्त धर्मगुरुंना निवेदन
सध्या आम्ही कोणत्याही प्रकारची कार्यवाही करत नाही, पण भोंग्यांच्या मोठ्या आवाजाबद्दल तक्रारी आल्या तर आम्ही त्याविरुद्ध कारवाई करू. भोंगा/लाऊडस्पीकर लावण्यासाठी परवानगी घेणं आवश्यक असेल. एका वेळी तीन महिन्यांसाठीच परवानगी मिळणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. तर मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत एकूण २,४०० मंदिरे आहेत. यापैकी २४ मंदिरांनी भोंगे लावण्याची परवानगी घेतलेली आहे. त्यांनी ५५ डेसिबलपेक्षा जास्त आवाज ठेवू नये.
राज ठाकरेंनी दिला इशारा
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलून धरला असून राज्यातील अनधिकृत भोंगे हटवण्यात यावेत आणि ध्वनी प्रदूषणाबद्ल सर्वोच्च न्यायालयाकडून देण्यात आलेल्या आदेशाचे पालन करण्यात यावे, यावर राज ठाकरे ठाम असल्याचे गेल्या काही दिवसांपासून पाहायला मिळत आहे. इतकेच नाही तर भोंग्यावरून मोठ्या आवाजात अजानचा वाजवल्यास त्या मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवू, असा इशाराही राज ठाकरेंनी दिला आहे. बुधवारीही राज ठाकरे यांनी भूमिकेवर कायम असून, भोंगे हटवेपर्यंत आणि नियमांची अंमलबजावणी करेपर्यंत सुरूच राहिल, असे म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App