मुंबईचे पोलीस आयुक्त म्हणाले पोलसी सर्वच ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत..पण आयुक्तसाहेब कायद्याचा धाक तर सर्वत्र पाहिजेच ना?


विशेष प्रतिनिधी

मुंबई : गुन्हा घडत असलेल्या सर्वच ठिकाणी पोलीस उपस्थित राहू शकत नाहीत असे सांगत मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी पोलीसांवरील जबाबदारी ढकलून टाकण्याचा प्रयत्न केला आहे. पोलीस सर्वच ठिकाणी उपस्थित राहू शकत नाहीत हे खरे असले तरी कायद्याचा धाक तर सर्वत्र असायला हवाच ना असा असा सवाल आता केला जात आहे.Mumbai Police Commissioner said that police cannot be present everywhere..but Commissioner, fear of law is needed everywhere, right?

मुंबईतील साकीनाका परिसरात झालेल्या बलात्कार पीडित महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. महिलेवर बलात्कार करण्यात आल्यानंतर गुप्तांगात रॉड घुसवल्याचा अमानवीय प्रकार समोर आला होता. साकीनाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे खळबळ माजली होती. जखमी अवस्थेत महिलेला उपचारासाठी घाटकोपरच्या राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.



मात्र मृत्यूशी तिची झुंज अपयशी ठरली आहे. या घटनेवरुन संपूर्ण देशभरातून संताप व्यक्त होत असून पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून न्यायालयाने आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

याबाबत बोलताना नगराळे म्हणाले, बलात्काराच्या घटनेची माहिती समजल्यावर पोलीस दहा मिनिटांत घटनास्थळी पोहोचले. साकीनाका बलात्कार प्रकरणात एकच आरोपी आहे. यात दुसरा आरोपी नाही. सीसीटीव्ही फुटेजमधून दिसत आहे. बलात्कार पीडित मृत महिलेचा जबाब नोंद करता आला नाही.ती बेशुद्ध अवस्थेतच होती. त्यामुळे नक्की काय घडलेलं आहे. याबद्दल आम्ही अनभिज्ञ आहोत. पण तपासातून याबाबत लवकरच अधिक माहिती प्राप्त होईल. हा तपास लवकरात लवकर पूर्ण होईल आणि चार्जशीट दाखल केली जाईल.

१० सप्टेंबरच्या रात्री ३ वाजून २० मिनिटाच्या दरम्यान खैरानी रोड साकीनाका येथे एक पुठ्ठ्याची कंपनी आहे. त्या कंपनीचा वॉचमन याने कंट्रोल रुमला फोन करून कळवलं की, इथे एका बाईला मारहाण सुरु आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर कंट्रोल रुमने संबंधित पोलीस स्टेशनच्या हद्दीतील पोलिसांना कळवलं.

संबंधित अधिकारी दहा मिनिटाच्या आत तिथे पोहोचले. तिथे त्यांना एका उघड्या टेम्पोत एक महिला अत्यंत गंभीर अवस्थेत आढळली. त्यावेळी पोलिसांनी जागेवर निर्णय घेऊन त्या महिलेला इतरत्र कुठे शिफ्ट न करता त्या टेम्पोची चावी हवालदाराने वॉचमनकडून घेऊन पोलिसांनी टेम्पो चालवत राजावाडी रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी त्या महिलेवर त्वरीत उपचार सुरु केले. चौकीदाराच्या तक्रारीवर गुन्हा दाखल केला आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी दिली.

या प्रकरणाच्या तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जलदगती न्यायालयात हा खटला दाखल करण्यास सांगितला आहे, अशी माहितीही नगराळे यांनी दिली.

Mumbai Police Commissioner said that police cannot be present everywhere..but Commissioner, fear of law is needed everywhere, right?

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात