former commissioner parambir singh : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती सुरू असलेल्या तपासाची सुई आता अंडरवर्ल्डकडे वळली आहे. आता वसुली प्रकरणात दाऊद इब्राहिमचा अँगल जोडला गेला आहे. मुंबई पोलीस आता 2016 च्या एका अशा ऑडिओची पुन्हा तपासणी करत आहेत ज्याच्या आधारे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या काळात कारवाई करण्यात आली होती. mumbai now the entry of don chhota shakeel in the recovery case investigation is going on against former commissioner parambir singh
विशेष प्रतिनिधी
मुंबई : माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या अवतीभोवती सुरू असलेल्या तपासाची सुई आता अंडरवर्ल्डकडे वळली आहे. आता वसुली प्रकरणात दाऊद इब्राहिमचा अँगल जोडला गेला आहे. मुंबई पोलीस आता 2016 च्या एका अशा ऑडिओची पुन्हा तपासणी करत आहेत ज्याच्या आधारे माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्या काळात कारवाई करण्यात आली होती.
दाऊद इब्राहिमचा उजवा हात छोटा शकीलने एका बिल्डरला धमकी दिल्याचा दावा या ऑडिओद्वारे करण्यात आला होता. हा ऑडिओ ‘एबीपी न्यूज’च्या हाती लागल्याचा दावा करण्यात आला आहे. यामुळे या प्रकरणातील नवीन वळण समजून घेणे गरजेचे आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह 6 पोलीस अधिकाऱ्यांविरोधात मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात तक्रार करणाऱ्या व्यक्तीचे नाव श्यामसुंदर अग्रवाल आहे. श्यामसुंदर अग्रवाल यांच्या मते, त्यांना बनावट प्रकरणात गोवण्यात आले आणि MCOCA केस चुकीच्या पद्धतीने नोंदवण्यात आली.
श्यामसुंदर अग्रवाल यांनी आरोप केला होता की, त्यांना आणि त्यांच्या कुटुंबाला धमकावण्यात आले आणि खंडणी वसूल करण्यात आली. ज्या ऑडिओच्या आधारे मुंबई पोलिसांनी 17 फेब्रुवारी 2021 रोजी श्यामसुंदर अग्रवालविरोधात गुन्हा नोंदवला, आता मुंबई पोलीस एसआयटी स्थापन करून त्याच ऑडिओची सत्यता तपासत आहेत.
मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऑडिओमध्ये छोटा शकील संजय पुनमिया नावाच्या बिल्डरला धमकावत आहे. पोलिसांच्या क्राइम डाटानुसार, ज्या फोन नंबरवरून संजय पुनमिया यांना फोन आला तो छोटा शकीलचा आहे. छोटा शकील फोन करून संजय पुनमियावर श्यामसुंदर अग्रवालसोबत समझौता करण्यासाठी दबाव आणत आहे.
संजय पुनमिया यांच्या तक्रारीवरून श्यामसुंदर अग्रवालविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘एबीपी न्यूज’ला मिळालेल्या ऑडिओमध्ये श्यामसुंदर अग्रवाल याचे नाव वारंवार येत आहे. हा ऑडिओ 2016 चा आहे, परंतु या वर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यावर कारवाई करण्यात आली.
आता श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून संजय पुनमिया आणि माजी आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचा असा विश्वास आहे की अग्रवाल यांच्याविरोधात नोंदवलेला गुन्हा बनावट होता आणि हा गुन्हा केवळ वसुलीसाठी नोंदवण्यात आला होता, ज्याची चौकशी सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वसुली करणाऱ्या अधिकाऱ्यांनी छोटा शकीलला अग्रवालचे नाव वापरून संजयला फोन करण्यास सांगितले, जेणेकरून अग्रवालवर गुन्हा दाखल करता येईल. तसेच श्यामसुंदर अग्रवाल यांच्याविरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यांत 19 गुन्हे दाखल आहेत.
mumbai now the entry of don chhota shakeel in the recovery case investigation is going on against former commissioner parambir singh
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App