मुंबई महापालिकेचा नुसताच फुगा, कोरोना लसीचे ग्लोबल टेंडर रद्द


लोकांची समजूत घालण्यासाठी मुंबई महापालिकेने कोरोना लसीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे सांगितले खरे, परंतु ही ग्लोबल टेंडर प्रक्रियाच रद्द झाली आहे.Mumbai municipal corporation corona vaccine global tender cancelled


विशेष प्रतिनिधी

मुंबई : लोकांची समजूत घालण्यासाठी मुंबई महापालिकेने कोरोना लसीचे ग्लोबल टेंडर काढणार असल्याचे सांगितले खरे, परंतु ही ग्लोबल टेंडर प्रक्रियाच रद्द झाली आहे.कोरोना प्रतिबंधक लसींच्या तुटवड्यामुळे मुंबईतील लसीकरणाचा वेग मंदावला आहे.

या समस्येवर तोडगा काढण्यासाठी मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडर काढलं आहे. मात्र या ग्लोबल टेंडरमधून एका पुरवठादाराने माघार घेतली होती. त्यामुळे नऊच कंपन्या या निविदा प्रक्रियेत होत्या . मात्र, लसींचा पुरवठा करण्यासाठीच्या अटी आणि शर्तीमध्ये या कंपन्या पात्र ठरल्या नाहीत.त्यामुळे अखेर ही ग्लोबल टेंडर प्रक्रिया रद्द झाली आहे. तसेच एकाही लस उत्पादक कंपनीने या निविदा प्रक्रियेत भाग घेतला नव्हता. त्यामुळेही महापालिकेला लस पुरवठ्याच्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारी कंपनी मिळू शकलेली नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून लसीकरणावर भर दिला जात आहे. त्या पार्श्वभूमी लसीचा पुरवठा होण्यासाठी मुंबई महापालिकेनं ग्लोबल टेंडर काढलं.

मात्र, या निविदा प्रक्रियेत भाग घेतलेल्या नऊ कंपन्यांपैकी एकही कंपनी पात्र न ठरल्याने अखेर हे टेंडर रद्द करण्यात आलं आहे. त्यामुळे महापालिकेच्या लसीकरण मोहिमेला ब्रेक बसलाय.

भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून शिवसेनेवर जोरदार हल्ला चढवलाय. पालिकेचे ग्लोबल टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती, अशा शब्दात भातखळकर यांनी शिवसेनवर टीका केलीय.

ते म्हणाले, पालिकेच्या ग्लोबल टेंडरचा फुगा फुटला. पालिकेचे हे टेंडर म्हणजे बिरबलाची खिचडी होती. जगातले अनेक देश लसीसाठी कंपन्यांना आगाऊ रक्कम देत असताना पालिका जाणीवपूर्वक ही रक्कम न देण्याचा हट्ट धरून बसली.

कारण एकच त्यांना पैसा टाकायचा नव्हता लसी घ्यायच्या नव्हत्या. फक्त नौटंकी करायची होती.भातखळकर यांनी ग्लोबल टेंडरवरुन शिवसेनेवर टीका करताना ठाकरे सरकारवरही हल्ला चढवलाय.

केंद्राने 45+ वयोगटासाठी दिलेल्या लशीतून सेलिब्रेटी आणि जवळच्या लोकांची सोय करणाऱ्या ठाकरे सरकारला आणि त्यांची सत्ता असलेल्या पालिकेला ग्लोबल टेंडरची केवळ धूळफेक करायची होती. हे जनतेच्याही आता लक्षात आलंय, अशी टीका त्यांनी केली आहे.

Mumbai municipal corporation corona vaccine global tender cancelled

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण भारतात आता एक देश एक चार्जर