Mumbai Metro : गुढी उभारण्याच्या दिवशी ठाकरे – पवारांची आपापली राजकीय पायाभरणी!!


विशेष प्रतिनिधी

मुंबई : मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तुरूंगात गेलेले नेते अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना त्यांची लढाई लढायला वाऱ्यावर सोडून शिवसेना आणि राष्ट्रवादीने गुढी उभारण्याच्या दिवशी वेगवेगळ्या दिवशी राजकीय पायाभरणी करून घेतली आहे.Mumbai Metro: Thackeray-Pawar’s own political foundation on the day of erection of Gudi

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जीएसटी भवनाचे भूमिपूजन ऑनलाइन केले. मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन आणि मेट्रोचे उद्घाटन प्रत्यक्षात केले. यात त्यांनी राजकीय बॅटिंग करत ईडी बिडीचे विषय न काढता फक्त महाविकास आघाडीत कसा समन्वय आहे, अजितदादा आणि आपण कसे एकत्र काम करत आहोत, याचेच भाषण करून घेतले. मेट्रोचे तिकीट काढून त्यांनी अजित दादांबरोबर प्रवास केला. मराठी भाषा भवनाच्या भूमिपूजन कार्यक्रमात त्यांनी प्रबोधनकार ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे या आजोबा आणि वडिलांच्या आठवणी काढत मराठी भाषेसाठी ठाकरे परिवाराने कसा संघर्ष केला याचे वर्णन केले.



राष्ट्रवादीत प्रवेश

तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगली जिल्ह्यातील शिराळ्यात शिवाजीराव नाईकांना भाजपमधून राष्ट्रवादीत आणले. त्यांना राज्यपातळीवर विशिष्ट भूमिका देण्याचे जाहीर केले.

इंदापूरमध्ये फोडाफोडी

आता त्यापुढे जाऊन इंदापुर मध्ये हर्षवर्धन पाटलांच्या मतदार संघात फोडाफोडी करून हर्षवर्धन पाटलांचे जवळचे नेते श्रीमंत ढोले यांना राष्ट्रवादीत प्रवेश दिला. या राजकीय खेळीतून शरद पवार हे हर्षवर्धन पाटलांचे पंख छाटत असल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. हर्षवर्धन पाटील 2024 च्या निवडणुकीत बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवतील, असा दावा मराठी माध्यमांनी केला आहे. त्यामुळेच शरद पवार हर्षवर्धन पाटील यांच्या जवळचे नेते फोडत आहेत, असा माध्यमांचा दावा आहे.

फडणवीसांना वगळले

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मेट्रोच्या उद्घाटन कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांना वगळून भाजपला डिवचले. त्यामुळे भाजपने उद्घाटन कार्यक्रमावर बहिष्कार घातला. हे एक प्रकारे मुख्यमंत्र्यांच्या पथ्यावरच पडलेले दिसते. यातून गुढी उभारण्याच्या दिवशी शिवसेना आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी आपापल्या कार्य क्षेत्रांमध्ये राजकीय पायाभरणी केल्याचे दिसून आले.

Mumbai Metro: Thackeray-Pawar’s own political foundation on the day of erection of Gudi

महत्त्वाच्या बातम्या

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात