वानखेडेंची बदनामी; मुंबई हायकोर्टाकडून नवाब मलिकांना कानपिचक्या!!

वृत्तसंस्था

मुंबई : कोणत्याही व्यक्तीच्या विरोधात वक्तव्य करताना वस्तुस्थितीचे भान राखले पाहिजे व्यक्तिस्वातंत्र्य आणि मतस्वातंत्र्य तसेच दुसऱ्याचा अधिक्षेप याच्यामध्ये समतोल राखला पाहिजे अशा शब्दात मुंबई हायकोर्टाने राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि मंत्री नवाब मलिक यांना कानपिचक्या दिल्या आहेत.Mumbai High Court slams Nawab Malik

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे मुंबई विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी हायकोर्टात केलेल्या याचिकेवर सुनावणी घेताना हाय कोर्टाने वरील टिप्पणी केली आहे.

नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांची बदनामी करणारी विधाने करण्याआधी भान राखावे, वक्तव्य करताना त्यांनी इतरांची नाहक बदनामी होणार नाही याची काळजी घ्यावी, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयाने नवाब मलिक यांनी कानपिचक्या दिल्या.


मी दुबईला जात आहे ; २४ नोव्हेंबरला पुन्हा भारतात येईन , माझ्यावर नजर ठेवा : नवाब मलिक


नवाब मलिक हे आपल्यासह कुटुंबाची बदनामी करणारी वक्तव्ये सोशल मीडियातून करत असतात, त्याला कोणताही आधार नसतो. त्यामुळे त्यांना सोशल मीडिया अथवा माध्यमांसमोर आपल्याविषयी बोलण्यास प्रतिबंध करण्यात यावा, तसेच त्यांनी आतापर्यंत आपल्याविषयी आणि आपल्या कुटुंबाविषयी केलेले पोस्ट डिलीट करण्याचा आदेश देण्यात यावा, या मागणीसाठी समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासाठी त्यांनी मलिक यांच्याविरोधात बदनामी केल्याबद्दल १.२५ कोटीचा दावा दाखल केला आहे. त्यात त्यांनी हे म्हटले आहे. यावर मंगळवारी उच्च न्यायालयात सुनावणी झाली.

मलिकांनी विधाने तपासून केली नाहीत

यावेळी न्यायालयाने नवाब मलिक यांना वानखेडे यांच्याविरोधात विधाने करण्यास प्रतिबंध करण्यास नकार दिला. मात्र नवाब मलिकांची यांनी वानखेडे यांच्या विषयी जी विधाने केली आहेत, ती त्यांनी योग्य पद्धतीने तपासून केलेली नाही, असे परखड मत न्यायालयाने नोंदवले आहे.

या प्रकरणी न्यायालयाने मलिक यांनी प्रतिज्ञापत्राद्वारे त्यांचे म्हणणे दोन आठवड्याच्या आत मांडण्याचा आदेश देत या प्रकरणाची सुनावणी २० डिसेंबर पर्यंत स्थगित केली आहे. याआधीच्या सुनावणीच्या वेळी न्यायालयाने मलिक यांनी ते कोणत्या कागदपत्रांच्या आधारे ज्ञानदेव वानखेडे मुस्लिम आहेत, ती कागदपत्रे न्यायालयात सादर करण्याचा आदेश दिला होता, त्याप्रमाणे मलिक यांनी कागदपत्रे सादर केली. त्याचवेळी ज्ञानदेव वानखेडे यांनीही ते मुस्लिम नसून दलित हिंदू असल्याचे दाखले देणारे कागदपत्रे न्यायालयात दाखल केली आहेत.

Mumbai High Court slams Nawab Malik

महत्त्वाच्या बातम्या