मुंबई ड्रग्स प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला जाण्याची शक्यता ?

वृत्तसंस्था

मुंबई : देशभरात गाजत असलेल्या मुंबई ड्रग प्रकरणाचा तपास आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविला जाण्याची शक्यता आहे. याबाबतचे वृत्त सीएनएन न्यूज१८ ने सूत्रांच्या हवाल्याने दिले आहे. Mumbai drugs case likely to go to NIA, sources said

वृत्तानुसार या प्रकरणाची लिंक आंतरराष्ट्रीय रॅकेटशी संबंधित असण्याची शक्यता आहे. या हायप्रोफाईल प्रकरणामध्ये एक मोठा कट आणि देशावरील संभाव्य धोका विचारात घेऊन हा तपास एनआयएकडे देण्यात येऊ शकतो. तत्पूर्वी मुंबई ड्रग प्रकरणाच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते.
सूत्रांनी सांगितले की, एनआयएची टीमने एनसीबीच्या विभागीय कार्यालयात सुमारे दोन तास माहिती घेतली.



मुंबईत एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या नेतृत्वाखाली ड्रगबाबत छापेमारी केली होती. मात्र या तपासावरून समीर वानखेडे यांना आरोपांचा सामना करावा लागत आहे. एक साक्षीदार प्रभाकर साईल याने वानखेडे यांच्यावर २५ कोटी रुपये घेतल्याचा आरोप केला होता. त्यानंतर तो भूमिगत झाला. दरम्यान, एनआयएकडे तपास सोपवण्याबाबतचे नोटिफिकेशन लवकरच निघू शकते.

पण, तपास एनआयएकडे सोपवण्यास एनसीबी आक्षेप घेऊ शकते. एनआयएचा हा हस्तक्षेप एनसीबीच्या अधिकारक्षेत्राला कमकुवत करू शकतो. तसेच भविष्यातील अन्य तपासामध्ये संस्थेच्या प्रतिष्ठेला धक्का देऊ शकतो. एका अधिकाऱ्याने सांगितले की, तपासामध्ये सध्या त्यांना कुठलाही दहशतवादी अँगल मिळालेला नाही.

Mumbai drugs case likely to go to NIA, sources said

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात