मुंबई महापालिकचे आता स्पुटनिक लशीच्या थेट खरेदीसाठी जोरदार प्रयत्न सुरु

विशेष प्रतिनिधी

मुंबई : रशियाने तयार केलेल्या ‘स्पुटनिक व्ही’ या कोरोना प्रतिबंधक लशीची थेट खरेदी करण्यासाठी मुंबई पालिका प्रयत्नशील आहे. यासाठी रशियन राजदूतांसह या लशीच्या निर्मितीत व्यावसायिक भागीदार असलेल्या रशियन कंपनीसोबत संपर्क साधला जात आहे. Mumbai corporation will trying to buy sputanic vaccine directly

पालिकेने रशियन राजदुतांसह थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याशिवाय या लशीच्या निर्मितीत व्यावसायिक भागीदार असलेल्या ‘रशियन डायरेक्ट इनव्हेंस्टमेंट फंड’ या कंपनीशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. भारतात स्पुटनिक लशीच्या मात्रेची किंमत पाहाता यासाठी ५०० कोटी रुपयांपर्यंत खर्चाची तयारी पालिकेने केली आहे. ही लस २ ते ८ अंश सेल्सिअस तापमानाला साठवता येते.



पालिकेने कोविड लस खरेदीसाठी निविदा मागविण्यात आल्या आहेत. लशींच्या पुरवठ्यासाठी तीन कंपन्यांनी पालिकेला प्रतिसाद दिला आहे. मात्र, या कंपन्या लसनिर्मिती करत नाहीत. त्या केवळ पुरवठादार आहेत. त्यामुळे पालिकेने जादाची कागदपत्रे सादर करण्याच्या सूचना कंपन्यांना केल्या आहेत.

Mumbai corporation will trying to buy sputanic vaccine directly

महत्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात