विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यंतरी आपल्या आजारपणानंतर एक अत्यंत महत्त्वाचे वक्तव्य केले. ज्यावेळी त्यांचे त्यांच्याकडची सत्तासूत्रे अन्य कोणा मंत्राला सोपविण्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू होती त्यावेळी त्यांनी आदित्यची मला खुप मदत झाली.Mumbai – Aditya pattern in Thane; Address cut of half Shiv Sena corporators ??; Tickets for young soldiers
शिवसेनाप्रमुखांनी माझ्यावर जे संस्कार केले ते मी पाळलेत आणि आदित्यही त्या संस्कारात वाढला आहे. शिवसेनेची चौथी पिढी आता जनतेच्या सेवेत येत आहे, असे उद्गार त्यांनी काढले होते.
यातून शिवसेनेत मोठ्या परिवर्तनाची नांदी होत असल्याचा संदेश महाराष्ट्रात पोहोचला आहे. याचे पहिले पडसाद मुंबई आणि ठाणे महापालिकांच्या निवडणुकीत पडण्याची शक्यता आहे. दोन्ही महापालिकांच्या निवडणुका शिवसेनेसाठी अत्यंत प्रतिष्ठेच्या आहेत आणि या महापालिकांवरील आपली पकड ढिली होऊ द्यायची नसेल
तर काही परिवर्तन करणे अपेक्षित आहे. हे परिवर्तन आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली होणार आहे. या परिवर्तनाचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मुंबई आणि ठाणे महापालिकेत जवळपास निम्म्या नगरसेवकांचा पत्ता महापालिका निवडणुका नगरीत कट होणार असल्याची बातमी आहे. त्यांच्या जागी युवा सेनेतल्या तगड्या आणि तरुण उमेदवारांना तिकीट मिळण्याची शक्यता आहे.
त्यामुळे विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले आहे. दोन्ही महापालिकांवरील पकड सत्ताधारी शिवसेनाला ढिली होऊ द्यायची नाही. त्यामुळे पुन्हा सत्तेवर येण्यासाठी शिवसेनेने नवी चाल खेळली असून, त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर परिवर्तनाचे वारे वाहताना दिसते आहे.
मुंबई ‘ ठाण्यात जवळपास अर्धे नगसरेवक तरुण असावेत, असा पर्यटन मंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांचा प्रयत्न आहे. ज्यांचे वय पन्नाशीपार आहे, अशा नगरसेवकांच्या ठिकाणी तरुण रक्ताला वाव देण्याची त्यांची इच्छा आहे. यावरून शिवसेनेत मंथन सुरू आहे.
मुंबई आणि ठाण्यात असा प्रयोग होऊ शकतो. मात्र, एखाद्या ठिकाणी तरुण उमेदवार चांगला नसेल, तर त्या ठिकाणी जुन्यांना संधी मिळू शकते. मात्र, कमीत कमी अर्ध्या जागांवर तरी नव्या रक्ताला वाव देण्याचा विचार आहे. तसा प्रस्ताव उद्धव ठाकरे यांना पाठवण्यात येणार आहे. त्यांच्या संमतीनंतर हा निर्णय होण्याची शक्यता आहे.
मुंबई-ठाण्यात हा निर्णय झाला, तर पुढे महाराष्ट्रातील इतर ठिकाणीही त्याची चाचपणी होऊ शकते. तरुण रक्ताला वाव मिळू शकतो. काहीही होवो. महापालिका निवडणूक फेब्रुवारी ते मे महिन्यात कधीही लागू शकते. हे ध्यानात घेऊन अनेकांनी तयारी सुरू केली आहे. बऱ्याच जणांनी प्रचारावरही भर दिलाय. मात्र, या नव्या खेळीमुळे अनेक विद्यमान नगरसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबईतील पक्षीय बलाबल
शिवसेना – 97 भाजप – 83 काँग्रेस – 29 राष्ट्रवादी – 8 समाजवादी पक्ष – 6 मनसे – 1 एमआयएम – 1 अभासे – 1
ठाण्यातील पक्षीय बलाबल
शिवसेना – 67 राष्ट्रवादी – 34 भाजप – 23 काँग्रेस – 3 एमआयएम – 2 अपक्ष – 2
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App