महिन्या अखेर चित्रपट चित्रपटगृहात झळकणार .. MS Dhoni’s production house first film..
विशेष प्रतिनिधी
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि लोकप्रिय खेळाडू महेंद्रसिंग धोनी आता नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे. क्रिकेट क्षेत्रात यशाचे अनेक शिखर चढल्यावर दोन्ही आता मनोरंजनाच्या क्षेत्रात आपले पाय रोवण्यास तयार झाला आहे. जाहिरात क्षेत्रात तर महेंद्रसिंग धोनी यांने काम केलं आहे. आता तो त्याच्या प्रोडक्शन हाऊस च्या माध्यमातून या नव्या क्षेत्रात पदार्पण करत आहे
धोनी एंटरटेनमेंट निर्मित ‘एलजीएम’ (LGM) म्हणजेच ‘लेट्स गेट मॅरिड’ असं या चित्रपटाचं नाव आहे. काल एमएस धोनीच्या हस्ते चेन्नईत या चित्रपटाचा ट्रेलर आणि ऑडिओ लाँच सोहळा पार पडला.यावेळी धोनीची पत्नी साक्षी आणि किक्रेटपटू दीपक चहर उपस्थित होते.
धोनीचा ‘एलजीएम’ हा तमिळ चित्रपट आहे. रमेश थमिलामानी यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. अभिनेता हरीश कल्याण, नादिया आणि इवाना ‘एलजीएम’मध्ये प्रमुख भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. लेट्स गेट मॅरिड’ या चित्रपटाची कहाणी गौतम व मीरा या पात्रांभोवती फिरणारी आहे. गौतम व मीराचे एकमेकांवर खूप प्रेम असते.
त्यामुळे दोघं लग्न करायचं ठरवतात, पण लग्नानंतर मीराला गौतमच्या आईबरोबर राहण्याची इच्छा नसते; त्यामुळे गौतम एक ट्रिप प्लॅन करतो. जेणेकरून त्याच्या आईचं आणि मीराचं नातं घट्ट होईल, असं या चित्रपटात दाखवण्यात आलं आहे.
दरम्यान, धोनी प्रोडक्शनचा हा पहिला वहिला चित्रपट ३१ जुलैला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. महेंद्रसिंग धोनी या चित्रपटाबाबत खूप उत्सुक आहे. एप्रिल २०२३ मध्ये ‘एलएजीएम’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित झाले होते, तेव्हा धोनी म्हणाला होता की, “हा चित्रपट प्रेक्षकांना आनंद देईल. ‘एलजीएम’ एक कौटुंबिक मनोरंजनात्मक चित्रपट आहे, जो सगळ्यांना आवडेल.’
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App