“तुमच्या काळात राजकारण अगदीच खालच्या पातळीवर गेलं” या आरोपावर देवेंद्र फडणवीस यांचं परखड उत्तर


खूपते तिथे गुप्ते या शोमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा खुलासा. Devendra fadnavis. On avdhut Gupte show Khupte tithe Gupte .

विशेष प्रतिनिधी

पुणे : खूपते तिथे गुप्ते या कार्यक्रमाच्या तिसऱ्या पर्वातल्या पुढील भागात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसणार आहेत. या कार्यक्रमात अनेक राजकारण आणि अभिनय या क्षेत्रातील मातब्बर व्यक्तींनी आजपर्यंत हजेरी लावली.

आहे . या कार्यक्रमात आलेल्या पाहुण्यांना अवधूत गुप्ते आपल्या दिलखुलास स्वभावातून खोसणारे आणि बोलणारे असे अनेक प्रश्न विचारतो . आणि त्या व्यक्तींना व्यक्त होण्याची संधी देतो.

सध्याचं राजकारण हे पूर्वीच्या राजकारणासारखं राहिलं नसून राजकारणाची पातळी अगदी खालच्या पातळीवर गेली आहे. राजकीय नेते अगदी आपली पातळी सोडून वैयक्तिक टीका करताना दिसतात. यापूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच कुटुंबापर्यंत राजकारण केलं नाही मात्र सध्या तेही चित्र दिसतं. टीका करताना पूर्वी लोक सत्व विवेक बुद्धी आणि विचार करून टीका करायचे आज मात्र अतिशय अश्लीघाय आणि चुकीच्या शब्दांमध्ये टीका होतीयं.
याच संदर्भात एक प्रश्न उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारण्यात आला. यावेळी अवधूतने त्यांना राजकीय वैर वैयक्तिक पातळीवर गेलंय, याबद्दल एक प्रश्न विचारला. त्यावर हे महाविकास आघाडी सरकारच्या काळपासून सुरू झाल्याचा दावा फडणवीसांनी केला.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zee Marathi (@zeemarathiofficial)

गेल्या १० वर्षांत राजकीय वैर अत्यंत वैयक्तिक पातळीवर गेलं. नेते अत्यंत खालच्या पातळीवर टीका करू लागले. हे तुमची सत्ता आल्यानंतर सुरू झालं, असं लोकांचं म्हणणं आहे,’ असा प्रश्न अवधूत गुप्तेने उपमुख्यमंत्र्यांना विचारला होता. त्यावर फडणवीस म्हणाले, “मी पुराव्यांसहित सांगू शकतो की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार जेव्हा आलं आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, त्यानंतर महाविकास आघाडीचे नेते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांच्या टीमने जे वैयक्तिक खालची पातळी गाठली आहे, ती महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला वाईट कलाटणी देणारी होती.”

Devendra fadnavis. On avdhut Gupte show Khupte tithe Gupte .

महत्वाच्या बातम्या 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*