विशेष प्रतिनिधी
मुंबई: राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी (MPSC Pre-exam) अर्ज करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सेवा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 साठी अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख (MPSC Application Date) दोन दिवसांनी वाढवण्यात आली आहे. त्यामुळे एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.MPSC Application Date: Extension of deadline for filling up application for State Service Pre-Examination; Applications can now be made up to this date
राज्य सेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली होती. परंतु ही तारीख आता वाढवण्यात आली असून परीक्षेसाठी उमेदवारांना 2 नोव्हेंबरपर्यंत अर्ज भरता येणार आहे.
राज्य सरकारच्या वतीन ही माहिती देण्यात आली आहे. एमपीएससीने याबाबत ट्वीट केले आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे — Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 30, 2021
राज्य सेवा पूर्व परीक्षा २०२१ करिता अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक २ नोव्हेंबर २०२१ पर्यंत वाढविण्यात येत आहे
— Maharashtra Public Service Commission (@mpsc_office) October 30, 2021
राज्य सेवा परीक्षा 2021 अंतर्गत एकूण 290 पदांसाठी भरती करण्यात येणार होती. मात्र या पदसंख्येमध्ये वाढ करण्यात आली आहे. एकूण 100 पदं वाढल्यामुळं आता 390 पदांसाठी 2 जानेवारी 2022 रोजी एमपीएससीकडून राज्य सेवा पूर्व परीक्षा आयोजित केली जाणार आहे. पदसंख्या वाढल्यानंतर अर्ज भरण्यासही मुदत वाढ देण्यात आली आहे.
राज्य सेवा पूर्व परीक्षेस पसणाऱ्या उमेदवारांना वेबसाईटवर जाऊन अर्ज भरावे लागणार आहेत. त्यामुळे परीक्षा देण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांना mpsc.gov.in या वेबसाईटला भेट देऊन अर्ज भरावा लागेल.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App