पीएमपीएलच्या कर्मचाऱ्यांच्या हक्कांसाठी आंदोलन मानवी साखळी द्वारे महापालिकेला घेराव


विशेष प्रतिनिधी

पुणे : पीएमपीच्याएल (PMPML) कर्मचाऱ्यांना येत्या ७ दिवसांत ७ वा वेतन आयोग लागू न झाल्यास पुणे शहरातील भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या घरासमोर, कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल. कर्मचाऱ्यांच्या या आक्रोशाने भाजप नेत्यांचे रस्त्यावर फिरणेही अशक्य होईल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष व सभागृहातील सदस्य या नात्याने प्रशांत जगताप यांनी भारतीय जनता पक्षाला इशारा दिला. Movement for the rights of PMP employees Surround the corporation by human chain

कर्मचाऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात कर्मचाऱ्यांनी मानवी साखळी द्वारे संपूर्ण महापालिकेस घेराव घातला होता. महानगरपालिका आयुक्त विक्रम कुमार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने निवेदन देण्यात आले.



 

या आंदोलन प्रसंगी शहराध्यक्ष प्रशांत जगताप दिपाली धुमाळ, कामगार सेलचे प्रदेशाध्यक्ष शिवाजीराव खटकाळे, प्रदीप देशमुख,सोमनाथ शिंदे,किरण थेऊरकर,सुनील नलावडे,राजेंद्र कोंडे,हरीश ओहोळ,कैलास पासलकर आदींसह पीएमपीच्याएल युनियनचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांनी भाग घेतला.

एक खासदार, सहा आमदार, महापौर, स्थायी समिती सभापती, सभागृह नेते, पीएमपीच्याएल वरील संचालक भाजपचे असतानाही कर्मचाऱ्यांवर अन्याय होतो याचा अर्थ भाजपला कर्मचाऱ्यांच्या हिताची पर्वा नाही, त्यांना फक्त ठेकेदाराचे कल्याण करायचे आहे, असे यावेळी जगताप यांनी सांगितले.

यासोबतच पुणे महानगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची सत्ता आल्यास पहिल्याच बैठकीत पीएमपीच्याएल कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय घेतला जाईल असे आश्वासन त्यांनी कामगारांना दिले.

Movement for the rights of PMP employees Surround the corporation by human chain

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात