प्रतिनिधी
पुणे : पुण्यात पोटच्या दोन मुलांकडून आईचा छळ झाल्याचा आणि कौटुंबिक अत्याचाराचा वेगळा आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आईलाच बेदम मारहाण करणाऱ्या कुपूत्रांवर बंडगार्डन पोलिस ठाण्यात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल झाला आहे. Mother abused by two children in Pune; A different and shocking incident of domestic violence
अहेमद अब्बास अली नईमाबादी ( वय ३९ ) आणि हुसेन अब्बास अली नईमाबादी ( वय ३२ ) अशी या दोन मुलांची नावे आहेत. नईमाबादी कुटुंबीयांनी त्यांच्या आई मुन्नवर नईमाबादी (वय ५८) यांचा संपत्तीमधील त्यांचा हिस्सा काढून घेण्यासाठी हा छळ केला. याबाबतची फिर्याद त्यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात केली आहे.
कोऱ्या स्टॅम्प पेपरवर आईने सह्या कराव्यात, फ्लॅट नावावर करून द्यावा, अशी त्यांच्या मुलांची आणि इतर नईमाबादी कुटुंबीयांची मागणी केली होती. पण, त्या त्यासाठी तयार नव्हत्या. मुलाने आईला खुर्ची फेकून मारली. तसेच, इतर कुटुंबीयांनी लाथा – बुक्क्यांनी मारहाण केली. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. तशाच अवस्थेत जीव वाचवत त्या भावाच्या घरी नाना पेठेत पोचल्या. पुढील तपास बंडगार्डन पोलिस करत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App