Modi – Patole : पंतप्रधान मोदींच्या विरोधात नाना पटोलेंचा आक्षेपार्ह वक्तव्ये; कारवाईचे दिलीप वळसेंचे आश्वासन!!

प्रतिनिधी

मुंबई : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत. त्यांच्यावर त्वरित कारवाई करावी, अशी मागणी मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार मंगल प्रभात लोढा यांनी ठाकरे – पवार सरकारचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांच्याकडे पत्राद्वारे केली होती. नाना पटोले यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिलीप वळसे-पाटील यांनी दिले आहे.Modi – Patole: Nana Patole’s offensive statements against PM Modi; Dilip Walse’s assurance of action !

मोदींवर नानांचे आक्षेपार्ह वक्तव्य

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य केली आहेत. मी मोदीला रोज मारतो असे वक्तव्य त्यांनी केले होते पण जेव्हा त्यांच्या विरोधात महाराष्ट्रासह देशभर संताप व्यक्त झाला तेव्हा नानांनी आपले वक्तव्य फिरवून आपण म्हटले ला मोदी म्हणजे पंतप्रधान मोदी नव्हे तर “गुंड मोदी” अशी मखलाशी केली होती.



परंतु हा “गुंड मोदी” नेमका कोण?, याचा खुलासा त्यांनी केला नव्हता बरेच दिवस माध्यमांमध्ये मोदी आणि “गुंड मोदी: यांची चर्चा नाना पटोले यांच्या आरोपांमुळे रंगली होती. या मुद्द्यावर मंगल प्रभात लोढा यांनी तक्रार केली होती झाला

नाना पटोले यांच्यावर कठोर कारवाई करावी तसेच महाराष्ट्र पोलिसांनी नाना पटोले यांच्या विरोधात तक्रार दाखल करून घेण्यास सूचना द्यावी, अशी मागणी मुंबई भाजपा शिष्टमंडळाने राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल नाना पटोले वारंवार आक्षेपार्ह वक्तव्य करत आहेत,

तरी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली गेली नाही त्यांच्या निषेधार्थ मंगल प्रभात लोढा यांच्या नेतृत्वाखाली संतप्त भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्रालयाजवळील महात्मा गांधींच्या पुतळ्यासमोर साखळी उपोषण केले होते. साखळी उपोषण सुरू असताना पोलिसांनी मंगल प्रभात लोढा तसेच भाजपा कार्यकर्त्यांना अटक देखील केली होती.

Modi – Patole: Nana Patole’s offensive statements against PM Modi; Dilip Walse’s assurance of action

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात