विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या चिपळूण दौऱ्यात शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी मुख्यमंत्र्यांसमोर आपली व्यथा मांडणाऱ्या महिलेला दमदाटी केली यावरून महाराष्ट्रातील जनतेमध्ये संताप उसळला असून राज्यातल्या सर्व विरोधी पक्षांनी भास्कर जाधवांवर टीकेची झोड उठवली आहे. मनसे नेत्या शालिनी ठाकरे यांनी तर भास्कर जाधव कोकणातली जनता तुम्हाला तुमची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही असे ट्विट केले आहे. MNS targets shiv sena MLA bhaskar jadhav over his arrogant attitude towards flood affected woman
महापुराचा सर्वाधिक फटका बसलेल्या चिपळूण शहराचा दौरा काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केली. यावेळी त्यांनी शहरातील व्यापाऱ्यांना धीर देताना पूरग्रस्तांसाठी नुकसानभरपाईची सर्वंकष योजना जाहीर केली जाईल असेही सांगितले. मात्र मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यातच शिवसेनेचे स्थानिक आमदार भास्कर जाधव यांनी एका महिलेला मुख्यमंत्र्यांसमोरच केलेल्या दमदाटीमुळे संपूर्ण दौऱ्याला गालबोट लागले. मुख्यमंत्र्यांनी दौऱ्यात केलेल्या घोषणांच्या ऐवजी भास्कर जाधव यांची अरेरावीची वर्तणूक सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाले त्यांच्यावर सगळीकडून टीकेची झोड उठली.
मुख्यमंत्री व्यापाऱ्यांशी चर्चा करीत असतानाच एका महिलेने ओक्साबोक्शी रडत तिची वेदना मांडली. ‘‘पुराचे पाणी माझ्या घराच्या छतापर्यंत पोहोचले. त्यात सर्वकाही वाहून गेले. तुम्ही काहीही करा, पण आम्हाला मदत करा. मदत केल्याशिवाय जाऊ नका हो’, अशी विनवणी तिने केली. मुख्यमंत्र्यांनीही या महिलेपुढे हात जोडत मदतीची ग्वाही दिली. मात्र यानंतर मुख्यमंत्र्यांसोबत असणाऱ्या भास्कर जाधव यांनी या महिलेच्या मुलालाच आईला समजाव असे मुख्यमंत्र्यांसमोरच सांगितले. तसेच पुढे जताना त्यांनी या महिलेच्या मुलाला उद्या भेट अशीही दमदाटी केल्याचे कॅमेरांनी टिपले.
या संपूर्ण प्रकरणाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर आता मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी ट्विटरवरुन भास्कर जाधावांना इशारा दिलाय. “भास्कर जाधव, आज त्या अगतिक महिलेवर जो हात उगारलाय ना…? तोच हात पुढच्या पाच वर्षांनी जोडून जेव्हा मते मागायला याल, तेव्हा हाच कोकणी माणूस तुम्हाला तुमची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही,” असे ट्विट शालिनी ठाकरे यांनी केले आहे.
या महिलेने सर्व आमदार खासदारांचा दोन महिन्यांच्या पगार कोकणला मदत म्हणून द्यावा अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली. त्यावेळी भास्कर जाधव यांनी महिलेला, “आमदार खासदारांनी सहा महिन्याचा पगार दिला तरी काय होणार नाय,” असं म्हटलं आणि मुख्यमंत्र्यांसोबत चालणाऱ्या ताफ्याला तिथून पुढे सरकरण्याचा इशारा दिला. मुख्यमंत्री थोडे पुढे गेल्यानंतर जाधव यांनी, “तुझा मुलगा कुठंय? तुझ्या आईला समजव. उद्या भेट,” अशी प्रतिक्रिया दिली. याच व्हिडीओवरुन भास्कर जाधवांवर टीकेची झोड उठली आहे.
अशा दुर्घटना घडू नयेत किंवा महापुराने नुकसान होऊ नये म्हणून पूरव्यवस्थापन करणारी यंत्रणा निर्माण करण्यात येईल. त्याचबरोबर ‘एनडीआरएफ’च्या धर्तीवर जिल्हा पातळीवरही स्वतंत्र आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा उभी करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App