विशेष प्रतिनिधी
मुंबई : चित्रपटात काम देण्यासाठी अभिनेत्रीकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्काादायक प्रकार उघडकीस आला आहे. याबाबतची माहिती समजल्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना चांगलाच चोप दिला.MNS activists slapped the accused for asking Actress for a role in the film
मनसेचे अमेय खोपकर यांनी या प्रकरणाचे व्हिडीओ आपल्या फेसबूक पोस्टमध्ये पोस्ट केले आहेत. यासोबतच संपूर्ण प्रकरण काय आहे याची सुद्धा माहिती दिली आहे. खोपकर यांनी सांगितले की, मनसे चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष पद्मनाभ राणे यांना एका अभिनेत्रीने फोन केला आणि सांगितले की एका कास्टिंग डायरेक्टरने मला फोन केला होता.
तुला एका हिंदी सिनेमात कास्ट केले आहे. जर तुला मुख्य भूमिका हवी असेल तर उद्या प्रोड्युसर लखनऊ येथून मुंबईत येणार आहेत. त्यांना तुला खूश करावे लागेल मग तुला मुख्य भूमिका मिळेल.
यानंतर अभिनेत्रीने हिंमत दाखवत मनसे चित्रपट सेनेला संपर्क साधला. ठाण्यातील घोडबंदर रोडवरील एका फार्महाऊसवर ही अभिनेत्री आरोपींसोबत गेली. त्यावेळी मनसेचे पदाधिकारी त्यांच्या मागावर होते. यावेळी मनसे पदाधिकाºयांनी आरोपींना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.
मनसेच्या कार्यकर्त्यांनी आरोपी गिरिजेश यादव, बिरालाल यादव, राहुल यादव आणि कंचन यादव या चौघांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. यापूर्वी मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी चौघांना चांगलाच चोप दिला.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App