वृत्तसंस्था
पुणे : पुण्यात वेश्याव्यवसाय न करणाऱ्या महिलांच्या विशेषतः मोलकरीण आणि कचरा वेचक यांच्या खात्यात राज्य सरकारकडून आलेली अर्थसहाय्याची रक्कम जमा झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, निधीच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे काही संस्था आणि गैरसरकारी संस्थांनी केली आहे. Misuse of prostitution funds in Pune ; Ngo Rushed To District Collector
पुण्यातील अण्णाभाऊ साठे नगर, तरवडे वस्ती आणि मोहम्मदवाडी परिसरात हा प्रकार प्रामुख्याने घडला आहे. तेथील महिला या प्रकाराने संतप्त झाल्या आहेत. त्यांनी खात्यात भरलेले पैसे सरकारला परत करण्यासाठी पावले उचलली आहेत. या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली. या बाबतची माहिती अशी, कोरोना काळात उपासमार होऊ नये, यासाठी राज्य सरकारकडून आर्थिक मदत आली होती.
ऑक्टोबर ते डिसेंबरसाठी न्यायालयाच्या आदेशानुसार पुण्यात वेश्याव्यवसाय करणाऱ्या 5 हजार 296 महिलांसाठी 7. 94 कोटी रुपयांचे अर्थसहाय्य जिल्हा महिला व बालकल्याण विभागाला प्राप्त झाले होते. त्याचे वाटपही दोन टप्प्यात झाल्याची माहिती सचिव अश्विनी कांबळे यांनी दिली होती. पण, आता वेश्या नसलेल्या महिलांना सुद्धा रक्कम देण्यात आल्याने निधीच्या वाटपात गैरव्यवहार झाल्याचा आरोप हमाल पंचायत आणि अखिल भारतीय बहुजन सेनेचे अध्यक्ष नितीन पवार आणि गैरसरकारी संस्था शेफाली यांनी केला असून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबतची तक्रार केली आहे.
पवार यांच्या मते तरवडे येथील काही अडाणी महिलांकडून एका अज्ञात गैरसरकारी संस्थेने संमती फॉर्म भरून घेतले होते. त्यात अनेक महिला या मोलकरीण, कचरा वेचक होत्या, अडाणी असल्यामुळे त्यांनी फॉर्म न वाचताच त्यावर स्वाक्षरी करून ते दिले. आधार कार्ड, बँक पासबुक कॉपी आणि वर 200 रुपयेही दिले. आता असे संमतीपत्र भरून दिलेल्या महिलांच्या खात्यात रक्कम जमा झाली आहे. आता त्या महिला संतप्त झाल्या असून आम्ही वेश्या नसून सरकारने पैसे परत घ्यावेत, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणी पोलिसात तक्रार केल्याची माहिती शेफाली संस्थेच्या संचालिका तेजस्वी सेवेकरी यांनी दिली.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App