विशेष प्रतिनिधी
मुंबई : गोव्यातल्या करेक्ट कार्यक्रमानंतर माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे आज मुंबईत जोरदार स्वागत केले. देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय नेतृत्वाच्या कौशल्यामुळे गोव्यात भाजपला बहुमत मिळाले. त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटण्याची जोरदार तयारी महाराष्ट्र भाजपने चालविली आहे. Mission Pendrive Bomb: Welcome to Devendra Fadnavis after the correct program in Goa, what will Devendra do in today’s budget in the Legislative Assembly… ??
देवेंद्र फडणवीस यांचे कार्यकर्त्यांनी मुंबईतल्या भाजप मुख्यालयात जोरदार स्वागत केले. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सुधीर मुनगंटीवार, आमदार आशिष शेलार, नितेश राणे आदी नेते उपस्थित होते. ढोल ताशाच्या गजरात फडणवीस यांचे स्वागत आणि सत्कार करण्यात आला.
या सत्कारानंतर देवेंद्र फडणवीस यांचे पुढचे लक्ष महाराष्ट्रावर असणार आहे. आज विधानसभेत महाविकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करणार आहेत. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस विधानसभेत काय करणार… पेन ड्राईव्ह पुराव्यांचा पुढचा भाग सादर करणार की अजून वाट पाहणार… याकडे सगळ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय तपास संस्थांच्या कायदेशीर कारवाया थांबणार नाहीत, असा इशारा देऊन भाजपच्या प्रादेशिक नेत्यांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये जोरदार हवा भरली आहे. राजकीय घराणेशाहीतले लोक हजारो कोटींचा भ्रष्टाचार करतात आणि कारवाई झाली, जात – धर्म यांच्या आडून कायदेशीर कारवाईला विरोध करतात, घराणेशाहीतल्या लोकांची ही प्रवृत्ती वाढत चालली आहे. पण लिहून घ्या, जनता ही राजकीय घराणेशाही मोडूनच काढेल, असा इशारा मोदींनी दिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांच्या मिशन पेनड्राइव्ह बॉम्बला जोर चढणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App