Pankaja Munde: केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र चालवले. यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसून सर्व अफवांचे खंडन केले. आता बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी पंकजा मुंडे यांना थेट शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं आहे. Minister shambhuraj desai in Beed Visit invites pankaja munde to join shiv sena
विशेष प्रतिनिधी
बीड : केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारानंतर खा. प्रीतम मुंडे यांना मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने नाराज होऊन त्यांच्या समर्थकांनी राजीनामा सत्र चालवले. यानंतर पंकजा मुंडे यांनी स्वत: पत्रकार परिषद घेऊन आपण नाराज नसून सर्व अफवांचे खंडन केले. आता बीड जिल्हा दौऱ्यावर आलेल्या गृह राज्यमंत्री शंभुराजे देसाई यांनी पंकजा मुंडे यांना थेट शिवसेनेत येण्याचं आमंत्रण दिलं आहे.
शंभुराज देसाई म्हणाले की, पंकजा मुंडे या बीड जिल्ह्यातील प्रमुख नेत्या आहेत. त्यांच्याकडे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांचा वारसा आहे. त्यामुळे जर त्या शिवसेनेत आल्या, तर त्यांचे नक्कीच स्वागत केले जाईल. त्यांचा योग्य तो मानसन्मानही आमच्या नेत्यांकडून केला जाईल. शंभुराज देसाई यांनी बीड जिल्हा दौऱ्यावर असताना हे वक्तव्य केले.
दरम्यान, मागच्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. त्यांच्या अनेक समर्थकांनी राजीनामा सत्र सुरू केलं होतं. यावर स्वत: पंकजा मुंडे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. तेव्हा त्यांनी केंद्रीय नेतृत्वावर विश्वास ठेवा. मी तुमचा राजीनामा स्वीकारणार नाही, असं म्हणत कार्यकर्त्यांना धीर दिला होता. त्या कार्यकर्त्यांना म्हणाल्या, आपली शक्ती कमी करण्याचा डाव आहे, पण आपण हा डाव पूर्ण होऊ द्यायाचा नाही. मला पुढेही खडतर मार्ग दिसतो आहे. योग्य निर्णय घेण्याची योग्य वेळ असते. पाच पांडव का जिंकले कारण त्यांच्याकडे संयम होता. जो चांगला असतो तो युद्ध टाळण्याचा प्रयत्न करतो. मी धर्मयुद्ध टाळण्याचा प्रयत्न तेव्हापर्यंत करते जेव्हापर्यंत शक्य आहे. आम्ही कुणालाच भीत नाही. मी कुणाचा निरादार करत नाही. मी माझ्यापेक्षा वयाने मोठ्या माणसाचा आदर करते. मला स्वतःसाठी काही नको, मला तुमच्यासाठी हवं आहे, असंही पंकजा मुंडे कार्यकर्त्यांना उद्देशून म्हणाल्या होत्या.
Minister shambhuraj desai in Beed Visit invites pankaja munde to join shiv sena
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App