विशेष प्रतिनिधी
जालना : ब्रॉडगेज असलेल्या देशातील सर्व मार्गांचं सन २०२३ पर्यंत विद्युतीकरण पूर्ण केले जाणार. तसेच ज्या ब्रॉडगेज रेल्वे मागार्चं विद्युतीकरण केलं जाणार आहे त्या मार्गावर देशभरात 400 वंदे भारत रेल्वे सुरू करणार असल्याची घोषणा केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केली.Minister of State for Railways Raosaheb Danve informed that 400 Vande Bharat Railways will be started across the country
दानवे यांच्या हस्ते आज मनमाड-मुदखेड रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी बोलताना दानवे म्हणाले, मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेन सुरू करण्यासाठी वेगाने काम सुरू असून या महिन्यात बुलेट ट्रेनसाठीचा डीपीआर निघणार आहे.
मुंबई-नागपूर बुलेट ट्रेनसाठी केवळ 38 टक्के जमीन कमी पडत असून ही जमीन संपादित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.यावेळी बोलताना केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड म्हणाले, राज्याचा अर्थसंकल्प म्हणजे नुसती धुळफेक असून या अर्थसंकल्पात काहीच नाही. हा अर्थसंकल्प कागदावर आणि हवेतच विरघळून जाणार आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App