‘MHADA’ ची लवकरच लॉटरी; ठाणे, नवी मुंबई, ठाणे, पुणे, संभाजीनगर मध्ये 7000 घरे उपलब्ध


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्रात हक्काच्या घराचं स्वप्न पाहणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कोकण म्हाडाच्या घरांसाठी डिसेंबरमध्ये येत्या १० दिवसात सोडत निघणार आहे. मुंबई उपनगर असलेल्या ठाणे, नवी मुंबई, वसई-विरारसह कोकणातील वेंगुर्ल्यात 2000 हून अधिक घरांची सोडत म्हाडा कोकण मंडळाकडून लवकरच काढण्यात येणार आहे. त्यामुळे लवकरच परवडणाऱ्या दरात आपले हक्काचा घर घेण्याचे स्वप्न तुमचंही पूर्ण होणार आहे. MHADA’s Lottery Soon; 7000 houses available in Thane, Navi Mumbai, Thane, Pune, Sambhajinagar

कोणासाठी गटासाठी किती असणार घरं?

अत्यल्प उत्पन्न गटासाठी १ हजार १

अल्प उत्पन्न गटासाठी १ हजार २३

मध्यम उत्पन्न गटासाठी १८

उच्च उत्पन्न गटासाठी ४ घरांचा समावेश (वेंगुर्ला)

येत्या दहा दिवसांत कोकण, पुणे आणि औरंगाबाद मंडळांतील घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोकण मंडळातील २ हजार ४६, संभाजीनगर मधील साधारण ८०० तर पुण्यातील ४ हजार ६७८ घरांसाठी एकत्रित जाहिरात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नव्या प्रणालीनुसार सोडतपूर्व आणि सोडतीनंतरची प्रक्रिया १०० % ऑनलाईन असणार आहे. त्यामुळे इच्छुकांना अर्जासब आवश्यक ती कागदपत्रे सादर करावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे सोडतीपूर्वीच पात्रता निश्चित होणार असून पात्र अर्जदारच सोडतीत सहभागी होणार आहेत.

म्हाडाच्या सोडतीत आरक्षित घरांसाठी पत्रकार, कलाकार, माजी सैनिक, स्वातंत्र्यसैनिकांसह इतर गटांना अर्ज करता येतो. या गटातील लोकांना सोडतीत घरे आरक्षित असतात. त्यांना देखील नव्या बदलानुसार आता प्रमाणपत्रे सोडतीपूर्वीच सादर करावी लागणार आहे. या प्रमाणपत्राची छाननीही सोडती आधी होणार असून केवळ पात्र अर्जाचाच सोडतीत समावेश होईल.

MHADA’s Lottery Soon; 7000 houses available in Thane, Navi Mumbai, Thane, Pune, Sambhajinagar

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    शिंदे – फडणवीसांची समृद्धी महामार्गावर टेस्ट ड्राईव्ह मोदींनी केला जगातील सर्वात मोठा रोड शो! मंत्रालयात प्रवेशद्वाराजवळ महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या तैलचित्राचे अनावरण