महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार उदघाटन


वृत्तसंस्था

पुणे : महापालिका निवडणुकीपूर्वी पुण्यात मेट्रो धावणार असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याचे वृत्त आहे. पुणे महापालिका बरखास्तीच्या आधी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर येणार आहेत. या महिन्याच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठड्यात हा दौरा होणार आहे. ते पुणे मेट्रोचे उद्घाटन, महापालिकेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याचे अनावरण करणार आहे.आर. के. लक्ष्मण आर्ट गॅलरीचे उदघाटन तसेच प्रकल्पांचे लोकार्पण व भूमीपूजनाचे कार्यक्रम या दौऱ्यात होणार आहे.



पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा गेल्या महिन्यात पुणे दौरा स्थगित केला होता. पुणे महापालिकेची १४ मार्चला मुदत संपत आहे. काही दिवसांपूर्वीच अजित पवारांच्या हस्ते मेट्रोच्या चाचणीला हिरवा झेंडा दाखवला होता. त्यानंतर फडणवीसांनी मेट्रोच्या कामाची पाहणी केली होती. त्यावेळी मोदींच्या हस्तेच पुणे मेट्रोचं उद्घाटन होईल, असं फडणवीस म्हणाले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही पुण्यातील मेट्रोची पाहणी केली होती.

Metro to run in Pune before municipal elections; It will be inaugurated by Prime Minister Narendra Modi

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात