विशेष प्रतिनिधी
मुंबई : सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत ५ कोटींची खंडणी मागणाऱ्या रेणू शर्मा हिने त्यांच्यावर दबाव आणण्यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांसह इतर पक्षाच्याही अनेक नेत्यांना संदेश पाठविल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी तिच्या जप्त केलेल्या मोबाइलमधून अनेक धक्कादायक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे.Message from Renu Sharma to key NCP leaders to put pressure on Dhananjay Munde
धनंजय मुंडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून मलबार हिल पोलिसांनी गुन्हा नोंदवला. पुढे हा गुन्हा गुन्हे शाखेच्या कक्ष २ कडे वर्ग करण्यात आला. शर्मा हिच्यावर पाच कोटी रुपयांसह महागड्या गिफ्टची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यानुसार मध्य प्रदेश येथून तिच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
यादरम्यान पोलिसांनी तिच्याकडून मोबाइल तसेच काही कागदपत्रे जमा केली. तसेच तिने अशाच प्रकारे हनी ट्रँपद्वारे आणखीन एकाकडून पैसे उकळल्याबाबत गुन्हे शाखेकडे तक्रार आली आहे. तसेच ती आंतराष्ट्रीय हनी ट्रॅप रॅकेटचा भाग असल्याचा संशय सरकारी वकिलांनी न्यायालयात वर्तवला होता.
तसेच, रेणू तपासाला सहकार्य करत नसून, तिने अशा प्रकारे किती जणांकडून पैसे उकळले याबाबत अधिक तपास करायचा असल्याचेही त्यांनी नमूद केले होते. तिचे बँक खाते मध्य प्रदेशला असल्याने त्याचाही तपास करणे बाकी असल्याचे त्यांनी सांगितले होते.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App