विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या विविध मागण्यांसाठी राज्यातील सरकारी रुग्णालयांतील परिचारिकांनी २१ जूनपासून आंदोलनाची हाक दिली आहे. त्यानुसार दोन दिवस दोन तास काम बंद. त्यानंतर दोन दिवस पूर्ण दिवस काम बंद आंदोलन केले जाणार आहे.Mediacl staff goes on strike from 25 june
या आंदोलनानंतरही मागण्या मान्य न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने दिला आहे.प्रलंबित मागण्यांसाठी परिचारिकांनी यापूर्वीही आंदोलन केले आहे. सर्व स्तरावर पाठपुरावाही सुरू आहे.
तरीही अद्याप या मागण्या मान्य झालेल्या नाहीत. त्यामुळे परिचारिकांमध्ये नाराजी असल्याचे संघटनेने सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारला जागे करण्यासाठी २१ व २२ जून रोजी दोन तास काम बंद; तर २३ व २४ जून रोजी पूर्ण दिवस काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.सध्या कोरोना काळात राज्यभरातील परिचारिका संपावर गेल्यास आरोग्य यंत्रणेला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App