सूर्यदत्ता’च्या विद्यार्थ्यांचे बावधन येथे हुतात्मा स्मारक स्वच्छता अभियान


विशेष प्रतिनिधी

पुणे : भारतीय प्रजासत्ताक दिन, नेताजी सुभाषचंद्र बोस जयंती, राष्ट्रीय मतदार दिन आणि शारीरिक शिक्षण दिन याचे औचित्य साधून सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या वतीने स्मारक स्वच्छता अभियान हाती घेण्यात आल्याची घोषणा ‘सूर्यदत्ता’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया यांनी केली. Martyr’s Memorial Cleanup Campaign at Bawadhan by Suryadatta’s students

बावधन येथील अमर जवान चौक येथील स्मारकाची सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी व शिक्षक यांनी साफसफाई करत या अभियानाची सुरुवात झाली. प्रत्येक तीन महिन्यातून एकदा स्मारकाची सफाई करण्याचा संकल्प विद्यार्थी, कर्मचारी व नागरिकांच्या उपस्थितीत केला.



हुतात्मा स्मारक स्वच्छता अभियानाच्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अशोक आंब्रे, त्यांच्या पत्नी प्रज्ञा आंब्रे, स्थानिक नगरसेवक दिलीप वेडे पाटील, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय चोरडिया, संचालक प्रा. अक्षीत कुशल, प्रा. सुनील धाडीवाल, शैला ओक, प्रशांत पितालिया, चेतन मुनगंटीवार, अभिजित गजरलवाल, प्रीती कुमठा, प्रिया सावरकर, बाटू पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी अशोक आंब्रे यांना ‘सूर्यभारत राष्ट्रीय पुरस्कार’ देवून सपत्नीक सम्मानित करण्यात आले. मानपत्र, सुवर्णपदक व ग्रंथ असे पुरस्काराचे स्वरूप होते. कार्यक्रमाचे आयोजन सूर्यदत्ता कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट यांच्या वतीने करण्यात आले. प्रा. उल्हास चौधरी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.

याप्रसंगी बोलताना प्रा. डॉ. संजय चोरडिया म्हणाले, “अशा प्रकारच्या कार्यक्रमातून राष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या, स्वातंत्र्यासाठी प्राण पणाला लावणाऱ्या हुतात्म्यांना मानवंदना दिली जाईल. तसेच विद्यार्थ्यासमोर, समाजासमोर एक वेगळा आदर्श प्रस्थापित होईल. राष्ट्र आणि विश्वाची सेवा हे सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्टिट्यूटची मूलभूत मार्गदर्शक तत्वांपैकी आहे.

विद्यार्थ्यांमध्ये हे तत्व रुजावे, त्यांच्यामध्ये राष्ट्रभक्ती जागरूक व्हावी, राष्ट्रनिष्ठा वाढावी आणि राष्ट्राप्रती प्रेमभावना रुजवावी या हेतूने कार्यक्रम राबविण्यात येत आहे.” सूर्यदत्ताचे विद्यार्थी, शिक्षक राष्ट्रदूत बनून ते ज्या ज्या क्षेत्रात जातील, जे जे कार्य करतील तेथे राष्टा प्रति अन्य दिव्य काम उभे करतील, राष्ट्रसेवा करतील आणि राष्ट्रीय मुल्यांचा आदर करतीय असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

“दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सूर्यदत्तामध्ये अभिनव उपक्रमाचे आयोजन केले जाते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रभक्ती रुजविण्याचा उद्देशाने आजवर अनेक विक्रम प्रस्थापित करणारे उपक्रम झाले आहेत. सलग २४ तास देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण, भारताच्या नकाशातून तुळशीचे वृक्षरोपण, स्वामी विवेकानंदांच्या विचारांचा जागर असे नाविन्यपूर्ण आणि विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असे उपक्रम घेण्यात आले आहेत.

यंदा कोरोनामुळे प्रजासत्ताक दिन ऑनलाईन स्वरूपात होत आहे. त्यामुळे बावधन भागातील या हुतात्मा स्मारकाची स्वच्छता करून, अनोख्या पद्धतीने राष्ट्राला अभिवादन करण्याचा मानस होता. या कार्यक्रमाला लेफ्टनंट जनरल अशोक आंब्रे यांना बोलावल्याने आणि त्यांचे सैन्यातील अनुभव ऐकताना विद्यार्थी भारावून गेले.”

लेफ्टनंट जनरल (निवृत्त) अशोक आंब्रे म्हणाले, “येथील सैनिक स्मारक अत्यंत प्रेरणादायी आणि विलोभनीय आहे. या स्मारकाच्या स्वच्छतेचा उपक्रम हाती घेत सूर्यदत्ताने विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनाही प्रेरणा दिली आहे. लोकांमध्ये राष्ट्राप्रति जागरूकता असेल तर राष्ट्र-विकासामध्ये अशा गोष्टींचे निश्चितच महत्व असते. अशा कृतींमुळे नव्या पिढीसमोर एक आदर्श निर्माण होतो आणि आदराची भूमिका तयार होते.

माझ्या दृष्टीने एका सैनिकाला आदर, त्याच्या कार्याची दखल घेतली जाणे हे महत्त्वाचे आहे. एक सैनिक राजस्थानचे वाळवंट असो की काश्मिरची थंडी डोळ्यात तेल घालून तो देशाचे प्राणप्रमाणे रक्षण करत असतो. कारण त्याला माहित असते की जनता आपल्या समवेत आहे. देश आपल्या सोबत आहे. सूर्यदत्ताने घेतलेल्या या उपक्रमामुळे निश्चितच आनंद झाला आहे.”

दिलीप वेडे पाटील म्हणाले, “सूर्यदत्ता शैक्षणिक समूहाच्या वतीने परिसरात नेहमीच विविध कार्यक्रम राबविले जातात. हे सर्वच कार्यक्रम अभिनव पद्धतीने राबविण्यात येतात. दोन वर्षापूर्वी या स्मारकाची उभारणी झाली आहे. भारताच्या स्वातंत्र्यासाठी राष्ट्रासाठी त्यांनी बलीदान केले, त्यांना मानवंदना देण्याचा कार्यक्रम येथे बावधन मधील नागरिकांच्या वतीने आम्ही घेतो. सूर्यदत्ताच्या कार्यक्रमामुळे ही संधी आणखी एकदा उपलब्ध झाली आहे.

याबद्दल प्रा. डॉ. संजय चोरडिया यांचे आभार व्यक्त करतो. कोरोनाचे सर्व नियम पाळत, अत्यंत नीट नेटक्या पद्धतीने आणि योग्य ती काळजी घेत व्यवस्थितपणे त्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. माझे कुटुंबिय आणि जनतेच्या वतिने त्यांचे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन करतो.”

Martyr’s Memorial Cleanup Campaign at Bawadhan by Suryadatta’s students

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात