राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी विषय शिकवावाच लागणार, नियम मोडल्यास शाळेला एक लाख रूपये दंड


विशेष प्रतिनिधी

पुणे: राज्यातील सर्व माध्यमांच्या शासकीय शाळा व खासगी शाळांमध्ये आता पाचवी ते दहावीपर्यंत मराठी भाषा विषय शिकवावाच लागणार आहे. नियम पाळला नाही तर शाळेला एक लाख रुपये दंड केला जाणार आहे.Marathi subjects will have to be taught in all schools in the state, the school will be fined one lakh rupees for breaking the rules

यापूर्वी जारी शासन आदेशात सुधारणा करून त्यात “मराठी भाषा विषय सक्तीचा’ असे स्पष्टपणे नमूद करत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने नवीन जीआर जारी केला आहे. नव्या निर्णयानंतर राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमाच्या शासकीय व सर्व खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा झाला आहे. मराठी विषय सक्तीच्या या कायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन केल्यास शाळेच्या व्यवस्थापनाला एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद आहे.



यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून राज्यातील सर्व शासकीय व खासगी शाळांमध्ये मराठी विषय शिकवण्याचे आदेश जारी केले होते. इयता ५ वी ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय (द्वितीय) शिकवण्याबाबत आदेशात नमूद केले होते.

त्यात मराठी विषय सक्तीचा असा उल्लेख नव्हता. त्यामुळे अनेक शाळांनी शासन आदेशाचा फायदा घेतला आणि मराठी विषय दुसऱ्या क्रमांकावर शिकवण्यास सुरुवात केली होती. आता नव्या निर्णयामुळे राज्यातील सर्व परीक्षा मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या सर्व माध्यमाच्या शासकीय व सर्व खासगी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा झाला आहे.

Marathi subjects will have to be taught in all schools in the state, the school will be fined one lakh rupees for breaking the rules

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात