राज ठाकरे यांच्यावरील टीकेमुळे मराठा संघटना आणि मनसे आमने-सामने


विशेष प्रतिनिधी

पुणे  : संभाजी ब्रिगेडचे नेते प्रवीण गायकवाड यांनी बाबासाहेब पुरंदरे यांच्यावरून मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती. त्यावरून आता मनसे आणि मराठा संघटना आमने-सामने आल्या आहेत. Maratha organizations and MNS face-to-face due to criticism on Raj Thackeray

पुणे कोणाच्या बापाचं नाही. छत्रपतींची बदनामी करणाऱ्या बाबासाहेब पुरंदरे यांच्या पाया पडून, लोटांगण घातलं म्हणजे खूप मोठे झालो अशा भ्रमात राहू नका. जी व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांची बदनामी करणाऱ्या व्यक्तीचं समर्थन करेल ती व्यक्ती महाराष्ट्राचा शत्रू आहे, ती शिवरायांचा शत्रू आहे असा इशारा  संभाजी ब्रिगेडचे श्रीमंत कोकाटे यांनी दिला आहे.

राज ठाकरेंना पुरंदरेंच्या पलिकडे इतिहासाचं आकलन नाही, अशी टीका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली होती. गायकवाड यांच्या टीकेला मनसे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी सज्जड दम भरला. लायकीत राहायचं नाहीतर पुण्यात फिरणं मुश्किल करु, असा इशारा वसंत मोरे यांनी दिला होता.  मोरे यांच्या या इशाºयाला श्रीमंत कोकाटे यांनी उत्तर दिले आहे. राज ठाकरे यांच्यावर तरुण मुलं खूप प्रेम करत होती, म्हणून त्यांनी त्यावेळी १३ जागा जिंकता आल्या. पण आता काय परिस्थिती आहे याचं आत्मचिंतन मनसेनं करावे असे त्यांनी म्हटले आहे.



गायकवाड यांनी फेसबुक पोस्ट लिहून राज ठाकरेंवर जोरदार टीका केली होती. राज ठाकरेंना जसे पुरंदरेंच्या पलीकडे इतिहासाचे आकलन नाही, तसेच त्यांना इथल्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक संघषार्चेही आकलन नाही. राजकारणात कुठलेही नवनिर्माण करता न आलेला आणि राजकारणात सपशेल अपयशी ठरलेला हा माणूस आता स्वत:च्या राजकीय फायद्यासाठी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हा सगळा संघर्ष उभा करण्याचा प्रयत्न करत दिसत आहे, अशी टीका प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.

हा संघर्ष उभा करत असताना त्यांना १८९९ ते १९९९ या शंभर वर्षाच्या काळात महाराष्ट्रात झालेल्या सांस्कृतिक संघषार्चा आणि आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे यांच्या वारशाचा राज ठाकरे यांना विसर पडला आहे, हे यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे. त्यांची सध्याची जी काही मांडणी आहे, ती प्रबोधनकार ठाकरेंच्या ब्राह्मणेतर विचारांपासून फारकत घेणारी आणि पुरंदरेंच्या ब्राह्मणी वर्चस्वाच्या विचारणसरणीला जवळ करणारी आहे हे मात्र नक्की, असेही प्रवीण गायकवाड यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हटले आहे.

Maratha organizations and MNS face-to-face due to criticism on Raj Thackeray

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात