महाराष्ट्रामध्ये पेट्रोल – डिझेल पन्नास रुपये लिटर करण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

वृत्तसंस्था

पुणे : महाराष्ट्रात पेट्रोल – डिझेल पन्नास रुपये लिटर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे. make petrol and diesel Rs 50 per liter in maharashtra Demand for Sambhaji Brigade from Pune

ऐंशी रुपये पेट्रोल – डिझेल दरवाढ झाल्यावर बोलणारी मंडळळी सध्या कुठेच दिसत नाहीत. कारण यांना सत्तेची मस्ती आणि पदाची सुस्ती चढलेली आहे. अर्थतज्ञांकडून अक्कल विकत घेऊन सरकारने तात्काळ इंधन दरवाढ ५० टक्केच्या वर कमी केली पाहिजे. म्हणून पेट्रोल डिझेलचे दर ५० रुपये लिटर पर्यंत दर कमी केले पाहिजे असेही त्यांनी सांगितले आहे.  पेट्रोल ५ रुपये आणि डिझेल १० रुपये दर कमी करणे म्हणजे लोकांची जखम कुरतडणे आणि जखमेवर’ची खपली काढण्याचा प्रकार आहे, अशी टीका त्यांनी केली.महागाईने जगणे मुश्किल

देशात जीएसटीची नवीन कर प्रणाली नरेंद्र मोदी सरकारने आणली. त्याला इंधन अपवाद ठेवले. पेट्रोल, डिझेल, गॅस हे सर्व जीएसटीच्या कक्षा आणावेत, अशी संभाजी ब्रिगेडची मागणी आहे.

make petrol and diesel Rs 50 per liter in maharashtra Demand for Sambhaji Brigade from Pune

महत्त्वाच्या बातम्या