विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा


वृत्तसंस्था

नागपूर : विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोने जोडणार आहे, अशी घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. Major cities in Vidarbha will be connected to Nagpur by mini metro; Union Minister Nitin Gadkari’s announcement

अमरावतीत महामार्गाचं लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमात गडकरी यांनी ही घोषणा केली. पुढील दीड वर्षांत नागपूर येथून वडसा, बडनेरा, यवतमाळ, रामटेक, चंद्रपूर, वर्धा अशा शहरांना मिनी मेट्रोद्वारे जोडण्याचा प्रकल्प हाती घेतल्याची माहिती गडकरींनी दिली आहे.मिनी मेट्रो या आठ डब्ब्यांच्या असतील. अत्याधुनिक सेवा उपलब्ध असतील. त्यातील इकॉनॉमी श्रेणी डब्याचे प्रवास दर बस प्रवासा इतके माफक असतील. या प्रकल्पासाठी उद्योजकांना पुढे येण्याचे आवाहन नितीन गडकरी यांनी केलं आहे. विदर्भात अनेक रस्त्यांच्या  कामांना चालना देण्यात आली असून नागपूर, काटोल, मोर्शी, अचलपूर, अकोट, शेगाव अशी अनेक उत्तम रस्त्यांनी शहरे जोडली जाणार आहेत, असे त्यांनी सांगितले.

Major cities in Vidarbha will be connected to Nagpur by mini metro; Union Minister Nitin Gadkari’s announcement

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    वेदांत – फॉक्सकॉन सेमी कंडक्टर प्रकल्पाचे सर्वेसर्वा अनिल अग्रवाल यांचे महत्वाचे मुद्दे वनडे फॉरमॅटमधून ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ॲरॉन फिंचची निवृत्ती भारत बनला 5वी सर्वात मोठी अर्थव्यवस्था