तुळजा भवानी मंदिराची बनावट वेबसाईट बनविणाऱ्यांना महाविकास आघाडीचे राजकीय संरक्षण


विशेष प्रतिनिधी

मुंबई : श्री तुळजा भवानी देवी मंदिराची बनावट वेबसाईट बनवून भाविकांची फसवणूक करणाऱ्यांना महाविकास आघाडीच्या नेत्यांचे राजकीय संरक्षण असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल आहे. याबाबतचा गुन्हा दाखल होऊन आठ दिवस उलटल्यावरही याबाबत कोणालाही अटक करण्यात आलेली नाही यामागे काळंबेरं असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे.Mahavikas Aghadi’s political protection to those who made fake website of Tulja Bhavani temple

श्री तुळजा भवानी देवीच्या हिंदू मंदिरातील भाविकांची फसवणूक झाल्याची घटना समोर आली होती. याबाबत उस्मानाबादचे जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी पोलिसांना श्री तुळजा भवानी देवस्थानच्या अधिकृत वेबसाईटचा तोतयागिरी करणाºया आणि भक्तांकडून बेकायदेशीररीत्या मोठ्या प्रमाणात पैसे गोळा करणाºया पाच बोगस वेबसाइट्सविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले होते.



मात्र, एफआयआर नोंदवून आठ दिवस उलटूनही संबंधित वेब डेव्हलपर्स आणि बनावट साइट अ‍ॅडमिनिस्ट्रेटरचे सेल क्रमांक त्या वेबसाइट्सवर स्पष्टपणे नमूद असतानाही, जिल्हा पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केलेली नाही. एका उच्चस्थ सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, या प्रकरणात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील काही राजकीय नेते सामील आहेत आणि पोलिसांवर राजकीय दबाव स्पष्टपणे दिसत आहे.

एका भक्त बाळासाहेब सुभेदार यांनी दहा दिवसांपूर्वी जिल्हाधिकारी दिवेगावकर यांना पत्र लिहून पाच वेबसाइट्सद्वारे केल्या जाणाºया आॅनलाइन फसवणुकीकडे आणि श्री तुळजा भवानी देवीची अधिकृत वेबसाइट असल्याचा आव आणून पैसे गोळा करण्याकडे त्यांचे लक्ष वेधले होते. देवस्थान मंडळाचे प्रमुख असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी देवस्थान व्यवस्थापन समितीला याप्रकरणी लक्ष घालण्याचे आदेश दिले. अहवाल प्राप्त होताच त्यांनी पोलिसांना या पाच बोगस वेबसाइट्सविरुद्ध एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले.

तुळजापूर पोलिसांनी 23 आॅक्टोबर रोजी एफआयआर नोंदवला. आजपर्यंत एकालाही अटक झालेली नाही. तुळजा भवानी मंदिरातील प्रसाद, अभिषेक, पूजा आणि इतर विधींसाठी वेबसाइट्स भाविकांकडून पैसे गोळा करत आहेत.

तुळजापूर शहरात वसलेली श्री तुळजा भवानी संपूर्ण महाराष्ट्र पूजली जाते आणि महाराष्ट्राची कुल-स्वामिनी (कुलदेवता – देवता) म्हणून तिचा उल्लेख केला जातो. या बोगस वेबसाइट प्रकरणाशी संबंधित प्रत्येकजण प्रश्न टाळून मौन पाळत आहे. या ऑनलाइन घोटाळ्यात सत्ताधारी महाविकास आघाडीमधील काही राजकीय नेते सामील असल्याचा आरोप एका स्थानिक भाजप नेत्याने केला आहे.

मूळ फिर्यादी असलेले बाळासाहेब सुभेदार हे स्थानिक पोलिसांनी अटक करण्यास केलेल्या दिरंगाईमुळे स्वाभाविकपणे चिडले आहेत. त्यांनी काही स्थानिक पत्रकारांना विचारले की स्थानिक सायबर पोलिस गुन्हेगारांशी हातमिळवणी करत आहेत का, कारण गुन्हेगारांचे मोबाईल नंबर खुलेआम उपलब्ध असूनही कारवाई होत नाही हे समजू शकत नाही.

तुळजापूर शहरातील स्थानिक विक्रेते अनिल यांच्या म्हणण्यानुसार या घोटाळ्यामागे काही राजकीय कार्यकर्ते आहेत. सरकारी अधिकाऱ्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या देवस्थानाची तोतयागिरी कोणी करू शकते आणि एफआयआर करूनही मोकळे राहते हे कळत नाही.

स्थानिक पोलिसांमधील काही घटक आणि गुन्हेगार यांची हातमिळवणी असल्याचा संशय काही स्थानिक पत्रकारांना आहे. स्थानिक व्हिडिओ न्यूज चॅनेल आणि स्थानिक प्रिंट मीडियाने पोलिसांच्या निष्क्रियतेवर जोरदार टीका केली आहे.

गुन्हेगारांकडून बनावट वेबसाईट तयार करून भाविकांची फसवणूक केल्याचा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. या गुन्हेगारांनी भ्रष्टाचाराची पातळी गाठली आहे हे पाहून आश्चर्य वाटते की ते सर्वात पवित्र देवस्थानांना देखील सोडत नाहीत

आणि पैसे लुटण्यासाठी बोगस वेबसाइट्स बनवून सर्वात धार्मिक सामान्य हिंदू भक्तांची फसवणूक करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. राज्य सरकारने तात्काळ दोषींना पकडावे आणि आधीच महामारीमुळे होरपळत असलेल्या भाविकांसाठी सुरक्षित वातावरण निर्माण करावे.

Mahavikas Aghadi’s political protection to those who made fake website of Tulja Bhavani temple

महत्त्वाच्या बातम्या

 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात