महाराष्ट्राची मास्क मुक्ती; गुढीपाडवा, आंबेडकर जयंती दणक्यात; शोभायात्रांना परवानगी!!


प्रतिनिधी

मुंबई : कोरोनाचा निर्बंधांचा जाच सहन करणारा महाराष्ट्र उद्या पासून मास्क मुक्त होत आहे. मागील जवळपास दोन वर्षांपासून राज्य कोरोनाच्या प्रभावाखाली होते. २१ मार्च २०२० पासून राज्यात निर्बंध घातले होते. त्यानंतर दोन वर्षांत हे निर्बंध कधी कडक तर कधी शिथील करण्यात येत होते, अखेर ३१ मार्च २०२२ रोजी राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील सर्व निर्बंध उठवण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता राज्य निर्बंधमुक्त झाले आहे, याबाबतची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.Maharashtra’s Mask Mukti; Gudipadva, Ambedkar Jayanti bangs; Permission for processions

आता १ एप्रिल नंतरचे सगळे सण-उत्सव पूर्वीप्रमाणे उत्साहात साजरे करता येणार आहेत. त्यामुळे यंदा गुढीपाडवा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती यांसारखे सण उत्सव दणक्यात साजरे करता येणार आहेत.



या बैठकीत राज्यातील कोरोनाचे निर्बंध कायम ठेवायचे की निर्बंध मुक्त करायचे हा विषय चर्चेला आला होता. त्यानंतर एकमताने राज्यातील सर्व निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला. दोन दिवसांत गुढीपाडवा हा सण आहे. त्यावेळी राज्यभर हिंदू नववर्ष स्वागत यात्रा काढल्या जातात, त्यावेळी मात्र या निर्बंधामुळे मर्यादा येणार, अशी चर्चा सुरू होती, मात्र आता राज्य मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे गुढीपाडावाच्या शोभायात्रा दणक्यात काढता येणार आहेत.

मास्क वापरणे ऐच्छिक

कोरोनामुळे राज्यभर मास्क वापरणे सक्तीचे होते, जे कोणी मास्क वापरणार नाही त्यांच्यावर दंडात्मक कारवाई केली जात होती, मात्र आता मास्क वापरणेही ऐच्छिक करण्यात आले आहे, ज्यांना मास्क लावायचे आहे, ते मास्क लावू शकणार आहेत, त्यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

Maharashtra’s Mask Mukti; Gudipadva, Ambedkar Jayanti bangs; Permission for processions

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात