विधान परिषद निवडणूक निकाल; बावनकुळे – अजितदादांची जर – तर ची भाषा!!


प्रतिनिधी

मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या 5 जागांचे निकाल लागत असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि राष्ट्रवादीचे नेते विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जर – तर च्या भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. नागपूर मध्ये ना. गो. गाणार या शिक्षक परिषदेच्या उमेदवारांचा पराभव झाला. तिथे महाविकास आघाडीचे सुधाकर आडबाले विजयी झाले. त्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरात भाजपचा उमेदवार असता, तर तो विजयी झाला असता, असे वक्तव्य केले आहे. Maharashtra state council Elections, chandrashekhar bawankule and ajit Pawar reacts in “ifs and buts” language

तर, नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे यांना काँग्रेसने उमेदवारी दिली असती, तर चित्र वेगळे दिसले असते, असे वक्तव्य अजितदादांनी केले आहे. सत्यजित तांबे हे अपक्ष उमेदवार असून ते सध्या शुभांगी पाटील या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या विरोधात आघाडीवर आहेत. या पार्श्वभूमीवर अजितदादांचे वक्तव्य महत्त्वाचे आहे. सत्यजित तांबे यांना काँग्रेसने निलंबित केले असून त्यांचे वडील माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनाही पक्षाने नोटीस दिली होती. नाशिकच्या उमेदवारीच्या मुद्द्यावर काँग्रेसमध्ये भरपूर राजकीय घमासान झाले होते. या पार्श्वभूमीवर देखील अजितदादांच्या वक्तव्याला विशेष महत्त्व आहे.


ठाकरे – आंबेडकर युती : पवारांचे कानावर हात; बावनकुळेंना युती टिकण्यावर शंका; महाविकास आघाडीच्या शेवटाचा हा डंका!!


ना. गो. गाणार यांना भाजपने नागपुरातून पाठिंबा दिला होता. त्यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचार केला होता. परंतु त्यांचा पराभव झाला. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बालेकिल्ल्यात भाजपने पाठिंबा दिलेल्या उमेदवाराचा पराभव झाल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिल्या आहेत. या पार्श्वभूमीवर चंद्रशेखर बावनकुळे यांनी ना. गो. गाणार हे भाजपचे उमेदवार नव्हते, तर शिक्षक परिषदेचे उमेदवार होते. भाजपने त्यांना फक्त पाठिंबा दिला होता. तेथे जर भाजपचे उमेदवार असतील तर फरक पडला असता, असे वक्तव्य केले आहे.

पण विधान परिषद निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी जर – तर च्या भाषेत प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे त्या प्रतिक्रियांची राजकीय वर्तुळात वेगळी चर्चा आहे.

Maharashtra state council Elections, chandrashekhar bawankule and ajit Pawar reacts in “ifs and buts” language

महत्वाच्या बातम्या 

 

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*    नितीन गडकरींकडून संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची हवाई पाहणी अभिमानास्पद! जगातील पहिला ‘बांबू क्रॅश बॅरियर’ महाराष्ट्रातील महामार्गावर ”महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल झाला आहे.”