समीर वानखेडें विरोधात महाराष्ट्र एसआयटीची चौकशी लावा; नवाब मलिकांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी


वृत्तसंस्था

औरंगाबाद – आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातला साक्षीदार किरण गोसावी याचा खासगी बॉडिगार्ड प्रभाकर साईल याने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे अधिकारी समीर वानखेडे यांच्याशी डील झाल्याचा दावा केला आहे. समीर वानखेडे आणि किरण गोसावी यांनी मिळून कसे सर्वांना पकडले याची माहिती प्रभाकर साईलने दिली आहे.Maharashtra SIT probe against Sameer Wankhede; Demand of Nawab Malik to the Chief Minister

या मुद्द्यावरून आता राष्ट्रवादीचे मंत्री आणि प्रवक्ते नवाब मलिक आक्रमक झाले असून त्यांनी समीर वानखेडे यांच्या विरोधात राज्याच्या विशेष तपास पथकाद्वारे अर्थात एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली आहे.



पिंपरी – चिंचवडमध्ये नवाब मलिकांनी समीर वानखेडे आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा बाप काढला होता. तर आता त्यांच्या विरोधात एसआयटी चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. औरंगाबादमध्ये बोलताना नवाब मलिक म्हणाले, की महाराष्ट्रात संघटित गुन्हेगारी वाढते आहे. त्यांच्याकडून वसूली करण्यापर्यंत अधिकाऱ्यांची मजल गेली आहे.

कोट्यावधी रूपये अधिकाऱ्यांनी उकळले आहेत. ते अनेकांवर खोट्या केसेस दाखल करीत आहेत. याचा तपास आणि चौकशी झाली तर अनेक धक्कादायक बाबी पुढे येतील. आम्ही मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना भेटून या एकूण प्रकरणाची एसआयटी चौकशी लावण्याची मागणी करणार आहोत, असे नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रभाकर साईलचा दावा

लोअर परळच्या ब्रीज खाली पहाटे साडेतीन पावणे चारच्या सुमारात सॅम, किरण गोसावी आणि एसआरकेची मॅनेजर होती. त्या तिघांमध्ये मिटिंग झाली. यानंतर त्यानी कारमधूनच आपल्याला फोन केला ‘२५ कोटींचा बॉण्ड’ करायला सांगितला. त्याती ल ८ कोटी समीर वानखेडेंना द्यायचेत आणि १० आपल्याला वाटायचे आहेत, असे ते म्हणाले.

पैशांसाठी आम्ही पहाटे साडेपाच वाजेपर्यंत मंत्रालयासमोर रस्त्यावर थांबलो. पण टॅक्सी न मिळाल्याने आम्ही वाशीला घरी निघून आलो. यानंतर काही वेळाने लगेच किरण गोसावीनी आपल्याला महालक्ष्मी स्टेशनजवळ ताडदेवजवळ इंडियाना हॉटेलजवळ थांबायला सांगितले. यानुसार आपल्याला एका कारमधून ५० लाख रुपये घेण्यास सांगितले. ५१०२ असा या कारचा क्रमांक होता, असा दावा प्रभाकर साईलने केला आहे.

त्यावर मराठी माध्यमांनी शिवसेना खासदार संजय राऊत तसेच अन्य नेत्यांच्या प्रतिक्रिया प्रसिध्द केल्या आहेत. आता नवाब मलिक यांनी याबाबत एसआयटी चौकशी लावण्याची मागणी केली आहे.

Maharashtra SIT probe against Sameer Wankhede; Demand of Nawab Malik to the Chief Minister

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात