वृत्तसंस्था
गुवाहाटी : बाळासाहेब ठाकरे यांनी देशाला हिंदुत्वाचा विचार केला त्यामुळे बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार आणि विकासाचा विचार घेऊनच आम्ही पुढची वाटचाल करणार आहोत आम्ही शिवसेना सोडलेली नाही सोडणार नाही अशा परखड आणि स्पष्ट शब्दांमध्ये एकनाथ शिंदे यांनी प्रथमच आपली भूमिका जाहीर केली आहे.Maharashtra political crisis: Eknath Shinde claims 40 Shiv Sena MLAs reached Assam, says will carry Balasaheb Thackeray’s Hindutva
गुवाहाटीतून एकनाथ शिंदे म्हणाले :
अद्याप राज्यपालांना भेटण्याचा तसेच भाजपला पाठिंबा देण्याचा कुठलाही निर्णय झालेला नाही. आम्ही गुवाहाटीत 40 पेक्षा जास्त आमदार आहोत. आम्ही शिवसेना सोडण्याचा तसेच इतर कुठल्याही पक्षात जाण्याचा आम्ही निर्णय घेतलेला नाही, फक्त आम्ही बाळासाहेबांचे हिंदुत्व, त्यांची भूमिका पुढे घेऊ जात आहोत.
सत्तेसाठी बाळासाहेबांच्या विचारांची तडजोड आम्ही करणार नाहीत. आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहोत त्यामुळे त्यांच्या विचारांवर आम्ही काम करणार आहोत. म्हणून, बाळासाहेबांच्या विचाराचे सर्व आमदार एकत्र आले आहेत. सध्या आम्ही कोणावर टीका टिप्पणी केलेली नाही. त्यामुळे विकासाचे राजकारण आणि बाळासाहेबांचे विचार पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
मी कालही कट्टर शिवसैनिक होतो आणि आजही आहे आणि उद्याही राहणार आहे. आमची भूमिका सुरुवातीपासून हिंदुत्वाची होती. त्यामुळे मी बाळासाहेबांचे विचार पुढे नेणार आहे. माझ्यासोबत कुठल्याही जोर जबरदस्तीने आमदार आलेले नाहीत. स्वत:च्या मर्जेने ते माझ्यासोबत आले आहेत. 40 पेक्षा जास्त आमदार माझ्यासोबत आहेत.
महाराष्ट्राचा राजकीय पेच आता गुजरातमधून आसामकडे सरकणार आहे. शिंदे यांच्यासह 40 बंडखोर आमदार सुरतहून विशेष विमानाने गुवाहाटीत पोहोचले आहेत. सुरत विमानतळावर माध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले होते की, आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व सोडले नाही. उद्धव ठाकरेंनी भाजपसोबत सरकार स्थापन करावे अशी माझी इच्छा आहे. माझ्यासोबत एकूण 40 आमदार आहेत, त्यापैकी 34 शिवसेनेचे आणि 7 अपक्ष आहेत.
Maharashtra political crisis: Eknath Shinde claims 40 Shiv Sena MLAs reached Assam, says will carry Balasaheb Thackeray's Hindutva Read @ANI Story | https://t.co/G8RXiKqxPG#MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde #ShivsenaMLA pic.twitter.com/IiUy3r7jh0 — ANI Digital (@ani_digital) June 22, 2022
Maharashtra political crisis: Eknath Shinde claims 40 Shiv Sena MLAs reached Assam, says will carry Balasaheb Thackeray's Hindutva
Read @ANI Story | https://t.co/G8RXiKqxPG#MaharashtraPoliticalCrisis #EknathShinde #ShivsenaMLA pic.twitter.com/IiUy3r7jh0
— ANI Digital (@ani_digital) June 22, 2022
भाजपच्या नेत्यांची फळी तैनात
विमानतळावर भाजपचे मोहित कंबोज आणि संजय कुटे बंडखोर आमदारांसोबत दिसले आहेत.
एकनाथ शिंदेंबरोबरच्या आमदारांची यादी
1. एकनाथ शिंदे – कोपरी 2 अब्दुल सत्तार – सिल्लोड, औरंगाबाद 3. शंभुराज देसाई – पाटण, सातारा 4. संदिपान भुमरे – पैठण, औरंगाबाद 5. भरत गोगावले – महाड, रायगड 6. नितीन देशमुख – बाळापूर, अकोला 7.अनिल बाबर – खानापूर-आटपाडी, सांगली 8.विश्वनाथ भोईर – कल्याण पश्चिम 9. लता सोनवणे- चाेपडा 10. संजय गायकवाड – बुलडाणा 11. संजय रायमूलकर – मेहकर 12. महेश शिंदे – कोरेगाव, सातारा 13. शहाजी पाटील – सांगोला, सोलापूर 14. प्रकाश आबिटकर – राधानगरी, कोल्हापूर 15 संजय राठोड – दिग्रस, यवतमाळ 16. ज्ञानराज चौगुले – उमरगा, उस्मानाबाद 17. तानाजी सावंत – परंडा, उस्मानाबाद 18. संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम 19. रमेश बोरनारे – वैजापूर, औरंगाबाद 20. श्रीनिवास वनगा, पालघर 21. बालाजी कल्याणकर -नांदेड 22. बालाजी किणीकर- अंबरनाथ 23. सुहास कांदे -नांदगाव 24. महेंद्र दळवी- अलिबाग 25. प्रकाश सुर्वे -मागाठणे 26. महेंद्र थोरवे -कर्जत 27. शांताराम मोरे -भिवंडी 28.किशोर पाटील- पाचोरा 29. चिमणराव पाटील- एरंडोल 30. प्रदीप जैस्वाल- औरंगाबाद
#WATCH Gujarat | Shiv Sena's Eknath Shinde seen with party MLAs at a Surat hotel, yesterday, June 21 As of now, Shinde, as per his claim, is with at least 40 MLAs who are camping in Guwahati, Assam pic.twitter.com/yvYI4rXbhJ — ANI (@ANI) June 22, 2022
#WATCH Gujarat | Shiv Sena's Eknath Shinde seen with party MLAs at a Surat hotel, yesterday, June 21
As of now, Shinde, as per his claim, is with at least 40 MLAs who are camping in Guwahati, Assam pic.twitter.com/yvYI4rXbhJ
— ANI (@ANI) June 22, 2022
उद्धव ठाकरेंच्या संपर्कातील आमदार :
1. वैभव नाईक 2. उदयसिंह राजपूत 3. रवींद्र वायकर 4. राहुल पाटील 5. उदय सामंत 6. प्रकाश फातर्पेकर 7. सुनील प्रभू 8. गुलाब पाटील 9. भास्कर जाधव 10. संतोष बांगर 11. आदित्य ठाकरे 12. राजन साळवी 13. अजय चौधरी 14. दिलीप लांडे 15. सदा सरवणकर 16. दादा भुसे 17. संजय पोतनीस 18. सुनील राऊत 19 कैलास पाटील 20. दीपक केसरकर 21.यामिनी जाधव 22. रमेश कोरगावकर 23. योगेश कदम 24. मंगेश कुडाळकर 25 प्रताप सरनाईक यापैकी काही आमदार शिंदेंच्या संपर्कात
मूळ शिवसेना कोणाची??
महाराष्ट्र भाजप उपाध्यक्ष कृपाशंकर सिंह यांची शिवसेनेत सुरू असलेल्या भांडणावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ओरिजिनल शिवसेना कोण आणि डुप्लिकेट शिवसेना कोण? यावर शिवसेनेत चढाओढ सुरू आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना कोणती आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना कोणती असा संघर्ष सुरू आहे. सध्या शिवसेनेत कट्टर शिवसैनिक आणि सॉफ्टकोअर शिवसैनिक यांच्यात लढत आहे.
शिवसैनिकांनी कुठलही बंड केलं नाही. कोणत्याही पक्षात जाण्याचा निर्णय घेतला नाही. बाळासाहेबांच्या विचारांपासून फारकत घेणार नाही. हिंदूत्व कधी सोडणार नाही. मुख्यमंत्री महोदयांशी माझी चर्चा झाली आहे. गर्व से कहो हम हिंदू है, अशी प्रतिक्रिया त्यांनी सुरत विमानतळावर दिली. भाजपसोबत युती झाली तर शिवसेना फुटणार नाही असा सुचक इशाराही एकनाथ शिंदे यांनी दिला आहे.
शिंदे-मुख्यमंत्री ठाकरेंची फोनवरून चर्चा
मिलिंद नार्वेकर यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली. त्यानंतर नार्वेकर यांच्या फोनवरुन एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरेंशी सुमारे पंधरा चर्चा झाली आहे. परंतू नेमकी काय चर्चा झाली हे मात्र अजून स्पष्ट झालेले नाही.
शिंदे उद्धव ठाकरेंना काय म्हणाले?
एकनाथ शिंदे यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सुमारे पंधरा मिनिटे चर्चा झाली. यात संजय राऊतांवर नाराजी व्यक्त केली. शिंदेंचा गैरसमज झाला असे राऊत एकीकडे म्हणतात तर दुसरीकडे शिंदेंनी आमदारांचे अपहरण केले असे म्हणतात अशी तक्रारही त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
मी शिवसेनेविरोधात बोललो नाही, स्वतंत्र पक्ष काढण्याची भाषा केली नाही. पक्षांतर केले नाही ना भाजपसोबत सत्ता स्थापनेसाठी कोणत्याही कागदावर सही केली नाही मग मला गटनेते पदावरुन का काढले? असा सवालही शिंदेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केला आहे.
मला मंत्रीपदाची लालसा नाही. पण भाजपसोबत सरकार स्थापन करा अशी मागणी करीत पुढे काय करायचे ते लवकरच अधिकृतपणे कळवणार आहे असे ठाकरेंना शिंदे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App