महाराष्ट्राला मिळणार सर्वाधिक 1500 मेट्रिक टन ऑक्सिजन, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना पुरवठ्याबाबत दिली सविस्तर माहिती

Maharashtra Oxygen Supply to get 1500 metric tonnes, says union minister piyush goyal

Maharashtra Oxygen Supply : देशातील कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी राज्यांनी केंद्र सरकारकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली होती. यानुसार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर वृत्तसंस्था एएनआयला सविस्तर माहिती दिली आहे. पीयूष गोयल म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त 1500 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. Maharashtra Oxygen Supply to get 1500 metric tonnes, says union minister piyush goyal


विशेष प्रतिनिधी

नवी दिल्ली : देशातील कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने अनेक राज्यांना ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे. यासाठी राज्यांनी केंद्र सरकारकडे या समस्येचे निराकरण करण्याची मागणी केली होती. यानुसार केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी राज्यांना करण्यात येणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर वृत्तसंस्था एएनआयला सविस्तर माहिती दिली आहे. पीयूष गोयल म्हणाले की, महाराष्ट्र राज्याला सर्वात जास्त 1500 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात मिळणार सर्वात जास्त ऑक्सिजन

पीयूष गोयल म्हणाले की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 12 राज्यांशी तपशीलवार बैठक घेण्यात आल्यानंतर केंद्र सरकारने राज्यांना विविध गरजांच्या अनुषंगाने रूपरेखा ठरवली आहे. याच अनुषंगाने एकूण 6177 मेट्रिक टन ऑक्सिजन राज्यांमध्ये वितरित करण्यात येणार आहे. गोयल म्हणाले की, महाराष्ट्राला सर्वात मोठा वाटा मिळणार असून तब्बल 1500 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा करण्यात येणार आहे. दिल्लीला 350 मेट्रिक टन आणि उत्तर प्रदेशला 800 मेट्रिक टनचा पुरवठा करण्यात येईल.

एका वर्षात वाढवली उत्पादन क्षमता

केंद्रीय मंत्री गोयल असेही म्हणाले की, कोरोना महामारीच्या आधी देशात मेडिकल ऑक्सिजनचा हजार ते बाराशे मेट्रिक टन खप होता. परंतु 15 एप्रिलच्या आकडेवारीनुसार 4,795 मेट्रिक टनांपर्यंत मेडिकल ऑक्सिजनचा वापर देशात होतोय. मागच्या वर्षभरात आम्ही ऑक्सिजनच्या उत्पादन क्षमतेत वाढ केली आहे.

गोयल यांनी नमूद केले की, 22 एप्रिलपासून महत्त्वाची 9 क्षेत्रे वगळता इतर औद्योगिक वापरासाठी ऑक्सिजनचा वापर करण्यास बंदी घालण्यात येत आहे. ही तात्पुरती तरतूद असेल. सर्व रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरेसा पुरवठा व्हावा, यासाठी हे पाऊल उचलण्यात येत आहे.

रेल्वेद्वारे करणार ऑक्सिजनचा पुरवठा

याशिवाय ऑक्सिजन सिलिंडर्स आणि ऑक्सिजनचे टँकर्स यांची रेल्वेद्वारे वाहतूक करण्याचाही निर्णय घेण्यात आला आहे. या रेल्वेंच्या विनाअडथळा व वेगवान वाहतुकीसाठी ग्रीन कॉरिडोर तयार करण्यात येत आहेत.

राज्यांनी ऑक्सिजनच्या मागणीचे व्यवस्थापन करणे गरजेचे

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी असेही म्हटले की, राज्य सरकारांनी मेडिकल ऑक्सिजनची मागणी नियंत्रणात ठेवावी. कारण पुरवठ्याच्या व्यवस्थापनाचे जसे महत्त्व आहे, तसेच मागणीचेही व्यवस्थापन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाच्या प्रसारावर आळा घालण्याची राज्य सरकारांची जबाबदारी आहे, आणि त्यांनी ती पार पाडली पाहिजे.

Maharashtra Oxygen Supply to get 1500 metric tonnes, says union minister piyush goyal

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    भारतात आता एक देश एक चार्जर जलयुक्त शिवार योजना पुन्हा चालू होणार; शिंदे – फडणवीस सरकारचा महत्त्वाचा निर्णय देशातील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार झाली लाँच : टाटा टियागो EV अवघ्या 8.49 लाखांपासून; एका चार्जवर 315 किमी