Maharashtra Curfew 2021 : महाराष्ट्रात संचारबंदीतही धडकी भरवणारी रुग्णसंख्या, 24 तासांत 68 हजारांहून जास्त रुग्णांची नोंद, 500 हून जास्त मृत्यू

Amid Maharashtra Curfew 2021 corona cases Increased, more than 68,000 patients registered in 24 hours

Maharashtra Curfew 2021 : रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 68,631 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत 503 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात गेल्या 24 तासांत 45,654 जण बरे झाले असून सध्या राज्यात 6,70,388 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे, राज्यात कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 60,473 वर पोहोचला आहे. Amid Maharashtra Curfew 2021 corona cases Increased, more than 68,000 patients registered in 24 hours


विशेष प्रतिनिधी

मुंबई : रविवारी महाराष्ट्रात कोरोनाचे 68,631 नवीन रुग्ण आढळले आहेत. याच कालावधीत 503 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, संपूर्ण राज्यात गेल्या 24 तासांत 45,654 जण बरे झाले असून सध्या राज्यात 6,70,388 सक्रिय रुग्ण आहेत. दुसरीकडे, राज्यात कोरोना संसर्गामुळे झालेल्या मृत्यूंचा आकडा 60,473 वर पोहोचला आहे.

देशाची आर्थिक राजधानी मुंबईतही कोरोना रुग्णसंख्येत अजूनही कमी झालेली नाही. रविवारी शहरात पुन्हा एकदा 8 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे, तर आणखी 53 जणांचा मृत्यू झाला आहे. आरोग्य विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या 24 तासांत मुंबईत कोरोनाचे 8459 नवे रुग्ण आढळले. यासह शहरातील सक्रिय रुग्णांची संख्या 87,698 पर्यंत पोहोचली आहे. तर शहरातील मृतांचा आकडा 12,347 वर पोहोचला आहे.

राज्यातील मुंबई, पुणे, नागपूर या शहरांत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग आढळून आला आहे. रविवारी नागपुरात कोरोनाचे 7107 नवीन रुग्ण नोंदवण्यात आले. याचदरम्यान 3987 जण बरेही झाले आहेत. नागपूरमध्ये गेल्या 24 तासांत 85 जणांचा मृत्यू झालाय. नागपुरातील एकूण बाधितांचा आकडा 3,23,106 वर पोहोचला असून शहरात सध्या 69,243 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाची ही भयंकर लाट थोपवण्यासाठी राज्यांत संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. निर्बंधांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाईचा इशारा रविवारी महाराष्ट्राचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. नवीन निर्बंध 14 एप्रिल रोजी रात्री 8 पासून सुरू झाले जे 1 मे रोजी सकाळी सातपर्यंत सुरू राहतील. या निर्बंधांमधून अत्यावश्यक सेवांना सूट देण्यात आली आहे.

राज्यात कलम 144 लागू असून एका ठिकाणी पाच किंवा त्याहून अधिक लोकांना एकत्र येण्यास मनाई आहे. कोरोनाच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी संचारबंदीचे व कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन केले पाहिजे, उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा गृहमंत्री वळसे पाटलांनी दिला आहे.

Amid Maharashtra Curfew 2021 corona cases Increased, more than 68,000 patients registered in 24 hours

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात