Maharashtra Lockdown Rules : महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार व काय बंद राहणार याची सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे हे नियम आज रात्री आठ वाजेपासून अमलात येतील. Maharashtra Lockdown Rules : Strict lockdown in the state from 8 pm tonight; Read the whole Guidelines
विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्रात देशातील इतर राज्यांच्या तुलनेत कोरोना महामारीचा सर्वाधिक प्रादुर्भाव दिसून आला आहे. दररोज विक्रमी संख्येने रुग्ण आढळून येत आहेत. कोरोना महामारीला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी रात्री 8 वाजेपासून राज्यात कडक लॉकडाऊन लागत असल्याची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री कार्यालयातर्फे या लॉकडाऊनच्या काळात काय सुरू राहणार व काय बंद राहणार याची सविस्तर नियमावली जाहीर करण्यात आली आहे. लॉकडाऊनचे हे नियम आज रात्री आठ वाजेपासून अमलात येतील.
नव्या नियमानुसार राज्य तसेच केंद्र सरकारची सर्व कार्यालये तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्यालये १५ टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील. तथापि, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी पूर्ण क्षमतेने उपस्थित राहतील. मुंबईतील लोकल, मेट्रो यांमधून केवळ शासकीय, वैद्यकीय कर्मचारी, अधिकारी यांनाच प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. सर्वसामान्यांना यामधून प्रवास करता येणार नाही. एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणाऱ्या लोकांना विनापरवाना प्रवास करता येणार नाही, असेही या आदेशात नमूद केले आहे.
याखेरीज मंत्रालय, MMR रिजनमधील अधिकारी किंवा कर्मचारी 15 टक्क्यांपेक्षा जास्त क्षमतेने बोलवावे लागत असल्यास महाराष्ट्र राज्य आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परवानगी अनिवार्य करण्यात आली आहे.
🚨New strict restrictions under #BreakTheChain🚨 To be implemented from 22nd April 2021, 8pm onwards pic.twitter.com/HLfI4h97p8 — CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
🚨New strict restrictions under #BreakTheChain🚨
To be implemented from 22nd April 2021, 8pm onwards pic.twitter.com/HLfI4h97p8
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 21, 2021
लग्न दोन तासांच्या वर चालवता येणार नाही. लग्नासाठी आता केवळ २५ लोकांची उपस्थिती ठेवता येईल. एकाच हॉलमध्ये एकाच वेळी लग्न पूर्ण करावे लागेल. वेगवेगळ्या हॉलमध्ये, वेगवेगळ्या वेळी, एकाच लग्नासाठीचे विधी करता येणार नाहीत. असे करताना आढळल्यास 50 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाईल. शिवाय ज्या हॉल किंवा हॉटेलमध्ये हे लग्न असेल, त्यावर कारवाई करून ते कोविड परिस्थिती संपेपर्यंत बंद ठेवले जाईल.
हॉस्पिटल, रोग निदान केंद्र, लसीकरण केंद्र, वैद्यकीय विमा कार्यालय, औषधांची दुकाने अशा 29 अत्यावश्यक सेवा 50 टक्के क्षमतेने चालवण्यात याव्यात आणि गरज असेल तर ती क्षमता 100 टक्क्यांपर्यंत वाढवता येईल.
बसेस वगळता इतर सर्व प्रवासी वाहतूक चालक वगळता 50 टक्के क्षमतेने चालवता येईल, पण ही वाहतूक एका शहरातून दुसऱ्या शहरात अथवा एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात करता येणार नाही. अशी वाहतूक फक्त अत्यावश्यक सेवा, वैद्यकीय सेवा, अंत्यसंस्कार किंवा कुटुंबातील अतिआजारी व्यक्तींना भेटण्यासाठी होईल, हा नियम तोडणाऱ्यांना 10 हजार रुपये दंड ठोठावला जाईल.
Maharashtra Lockdown Rules : Strict lockdown in the state from 8 pm tonight; Read the whole Guidelines
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App