विशेष प्रतिनिधी
मुंबई : महाराष्ट्र मंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत सुरू होत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन मंत्री नवाब मलिक आणि प्रसाद तनपुरे यांच्या राजीनाम्याच्या मुद्द्यांवर महाविकास आघाडी सरकारला घेरले जाणार आहे. Maharashtra Legislative Assembly Convention: Ghamasan will be held on the issues of resignation of NCP Minister Nawab Malik and Prajakt Tanpure !!
महाविकास आघाडी सरकारचा तिसरा अर्थसंकल्प 11 मार्च रोजी विधानसभेत मांडण्यात येणार आहे. परंतु, या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे दोन मंत्री नवाब मलिक आणि प्राजक्त तनपुरे यांच्यावर सक्तवसुली अर्थात ईडीने कारवाई केली आहे. नवाब मलिक ईडीच्या कोठडीत आहेत, तर प्राजक्त तनपुरे यांच्या राम गणेश गडकरी साखर कारखान्याची 13 कोटींची मालमत्ता जप्त केली आहे. प्राजक्त तनपुरे अजूनही नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या या दोन मंत्र्यांमुळे महाविकास आघाडीचे ठाकरे – पवार सरकार राजकीयदृष्ट्या अडचणीत आले आहे.
या दोघांच्या या दोन मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी भाजप विधिमंडळ प्रचंड आक्रमक होणार आहे. मंत्र्यांचे राजीनामे घेतले नाहीत, तर विधिमंडळ अधिवेशन चालू देणार नाही, असा इशारा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी आधीच दिला आहे.
त्याच बरोबर एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा ज्या भाजपच्या 12 आमदारांचे वर्षभरासाठी निलंबन केले होते, त्यांची विधानसभेच्या सदनात वापसी होणार आहे. सुप्रीम कोर्टाने 12 आमदारांना वर्षभरासाठी निलंबित करता येणार नाही, असा निकाल दिला आहे. त्यामुळे भाजपची विधानसभेत ताकद वाढणार आहे. विधानसभेच्या अध्यक्षांची निवडणूक याच अधिवेशनात होण्याची शक्यता आहे. पण ती आवाजी मतदानाने रेटून नेण्याचा महाविकास आघाडी सरकारचा प्रयत्न आहे. ही निवडणूक गेली दोन अधिवेशने टळत आली आहे. निदान या अधिवेशनात तरी विधानसभेला पूर्णवेळ अध्यक्ष मिळणार का?, अशी शंका तयार झाली आहे.
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App