सीमा प्रश्नी 3 फोरमवर महाराष्ट्राची एकजूट; फडणवीस – पवार – बाळासाहेबांची शिवसेना एकसूर


प्रतिनिधी

मुंबई / नवी दिल्ली : महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नावर कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई आक्रमकपणे विशिष्ट भूमिका मांडत असताना बेळगावात महाराष्ट्राच्या 6 ट्रकवर दगडफेक झाली. त्यानंतर महाराष्ट्रातले नेते देखील वेगवेगळ्या फोरमवर एकवटले असून त्यांनी बेळगावातल्या घटनेचा निषेध करत एकसूरात भूमिका मांडली आहे. Maharashtra karnataka boundary dispute; marathi leaders put same tune of unity

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना फोन करून बेळगावत महाराष्ट्रातल्या ट्रकवर झालेल्या दगडफेकीचा निषेध केला आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. त्याचबरोबर महाराष्ट्रातले एकही गाव कर्नाटकात जाणार नाही. त्या सर्व गावांच्या विकासासाठी महाराष्ट्र सरकार कटीबद्ध आहे, अशी ग्वाही दिली.



दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुंबईत घेतलेल्या पत्रकार परिषदेत महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे मेसेज वाचून दाखवत आपण स्वतः बेळगावला जाणार असल्याचा इशारा कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना दिला. महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर एकजूट करून केंद्रीय गृहमंत्र्यांपुढे महाराष्ट्राची भूमिका मांडावी, असा आग्रह त्यांनी धरला.

पण त्याआधीच दिल्लीत संसदेच्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने घेतलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी सीमा प्रश्नाचा उल्लेख करून एक समिती गठित करून तो प्रश्न कायमचा मिटवण्याची मागणी केली. बेळगावात मराठी भाषकांवर कन्नड सक्ती लादली जात आहे. ती सहन केली जाणार नाही, असा इशारा त्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिला आहे. महाराष्ट्रातल्या तीन पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांची एकसूरातली भूमिका आज समोर आली आहे.

संसदेच्या हिवाळी अधिवेना निमित्त सरकारने आयोजित केलेल्या सर्व पक्षीय बैठकीत बाळासाहेबांच्या शिवसेनेने सीमा प्रश्न मांडला. कर्नाटकात मराठी मुलांना शाळेत कन्नड भाषा सक्ती केली जाते आहे. याबाबत त्वरीत समिती स्थापन करून निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार हेमंत पाटील यांनी केली.

Maharashtra karnataka boundary dispute; marathi leaders put same tune of unity

महत्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात