मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात अतिवृष्टी ; अरबी समुद्रात नव्या चक्रीवादळाची शक्यता


 

विशेष प्रतिनिधी

मुंबई : बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले चक्रीवादळ निवळले आहे. आणि आता त्याचे कमी दाबाच्या क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीचा धोका निर्माण झाला आहे. Maharashtra: Heavy rains in Marathwada, flood situation in Beed and Latur villages, bus washed away in Yavatmal

येत्या २४ तासात मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणात अतिवृष्टीची शक्यता आहे. सोमवारी चक्रीवादळ निवळले आणि त्याचे रूपांतर आता कमी दाबाच्या क्षेत्रात झाले आहे. हे क्षेत्र सध्या छत्तीसगढ आणि ओडिसाच्या दक्षिणेला आहे. त्यानंतर ३० सप्टेंबरला हे कमी दाबाचे क्षेत्र असून अरबी समुद्रात त्याची तीव्रता पुन्हा वाढून नवे चक्रीवादळ निर्माण होण्याचा अंदाज आहे. या चक्रीवादळाचे नाव शाहीन असणार आहे.

 



पुढील ३-४ तासात धुळे, पालघर ,ठाणे ,मुंबई ,रायगड, नाशिक अहमदनगर ,पुणे ,सातारा जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे.

राज्यात पुढील २४ तासात गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळे मराठवाडा ,मध्य महाराष्ट्र ,कोकणात मुसळधार व अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात या चक्रीवादळाचा मोठा परिणाम जाणवत आहे.Maharashtra: Heavy rains in Marathwada, flood situation in Beed and Latur villages, bus washed away in Yavatmal

महत्त्वाच्या बातम्या

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात