Energy Minster Nitin Raut : ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागासाठी तातडीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील महा विकास आघाडी सरकारने आदेश दिला आहे की, पूरग्रस्त भागातील लोकांकडून वीज बिल वसूल केले जाणार नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. Maharashtra Flood affected areas relief of Electricity and light bills by Mahavikas Aghadi Government as announced by Energy Minster Nitin Raut
विशेष प्रतिनिधी
मुंबई : मुसळधार पावसामुळे पश्चिम महाराष्ट्र, कोकण, रायगड जिल्ह्यांमध्ये जीवित हानी आणि मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नुकसानीचा आढावा घेतलेला आहे. आतापर्यंत राज्य सरकारने पूरग्रस्तांसाठी कोणतेही पॅकेज जारी केलेले नाही. लवकरच मदत जाहीर केली जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे. दरम्यान, ठाकरे सरकारने पूरग्रस्त भागासाठी तातडीने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. राज्यातील महा विकास आघाडी सरकारने आदेश दिला आहे की, पूरग्रस्त भागातील लोकांकडून वीज बिल वसूल केले जाणार नाही. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
नितीन राऊत म्हणाले की, आम्ही आदेश दिला आहे की पूरग्रस्त भागात परिस्थिती सामान्य होईपर्यंत वीज बिल वसूल केले जाणार नाही. लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. आयुष्य सामान्य होण्यास बराच वेळ लागणार आहे. जनजीवन सामान्य होईपर्यंत वीज बिल वसूल होणार नाही. मात्र, वीज बिल माफ करण्याचा निर्णय अद्याप घेण्यात आलेला नाही. हा निर्णय फक्त मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाऊ शकतो.
नितीन राऊत म्हणाले की, काही काळापासून निसर्ग सतत कहर करत आहे. तौक्ते चक्रीवादळ आणि पुरामुळे बरेच नुकसान झाले आहे. बऱ्याच वेळा ऊर्जा विभागाला प्रथम निसर्गाच्या कहराला सामोरे जावे लागते. यामुळे आता भविष्यातील संकट लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापनाची तयारी ठेवावी लागेल. कोकणात वारंवार त्रास होतो. त्यामुळे येथे NDRFचे कायमस्वरूपी बेस कॅम्प असणे आवश्यक आहे. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आमची मागणी आहे की, त्यांनी याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोलावे.
Maharashtra Flood affected areas relief of Electricity and light bills by Mahavikas Aghadi Government as announced by Energy Minster Nitin Raut
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App