महाराष्ट्रात कोरोनाचा कहर : भाजप नेते प्रवीण दरेकर पॉझिटिव्ह, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कर्मचाऱ्यांनाही लागण; आतापर्यंत 13 मंत्री, 70 आमदारांना लागण

महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याशिवाय भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. Maharashtra Corona Crisis BJP leader Praveen Darekar positive, MNS president Raj Thackeray’s staff also infected; So far 13 ministers, 70 MLAs have been infected


वृत्तसंस्था

मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा एक कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. याशिवाय भाजप नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज ठाकरे यांचे घर आणि कार्यालय ‘शिवतीर्थ’मध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळला आहे. यानंतर शिवतीर्थच्या उर्वरित कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी केली जात आहे. आज (५ जानेवारी, बुधवार) राज ठाकरे हे स्वतः कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे.



काल शिवसेनेचे चार मोठे नेतेही कोरोना पॉझिटिव्ह आढळले. त्या चार बड्या नेत्यांमध्ये नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, खासदार व माजी केंद्रीय मंत्री अरविंद सावंत, युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि आमदार प्रताप सरनाईक यांचा समावेश आहे. याशिवाय भाजपचे आमदार अतुल भातखळकर हेदेखील काल कोरोना पॉझिटिव्ह आढळले.

संध्याकाळी, महाविकास आघाडी सरकारमधील कॅबिनेट मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले होते की, राज्यातील 13 मंत्री आणि 70 आमदार कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यात महाराष्ट्रातील २६ बडे नेते आहेत. यापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्याच्या मंत्रिमंडळातील 10 मंत्री आणि 20 आमदार कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती दिली होती. म्हणजेच मंत्रिमंडळातील सदस्यांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे.

हे २६ बडे नेते कोरोनाच्या विळख्यात

1. के.सी. पाडवी – आदिवासी कल्याण मंत्री

२. वर्षा गायकवाड – शिक्षण मंत्री

3. बाळासाहेब थोरात – महसूल मंत्री

4. यशोमती ठाकूर – महिला बालकल्याण मंत्री

5. प्राजक्त तनपुरे – राज्यमंत्री

6. समीर मेघे – भाजप आमदार

7. धीरज देशमुख – काँग्रेस आमदार

8. राधाकृष्णविखे पाटील-भाजप आमदार

9. सुप्रिया सुळे – राष्ट्रवादीच्या खासदार

10. दीपक सावंत – माजी मंत्री

11. माधुरी मिसाळ- भाजप आमदार

12. चंद्रकांत पाटील – आमदार

13. इंद्रनील नाईक – आमदार

14. हर्षवर्धन पाटील – माजी मंत्री

15. सदानंद सुळे – सुप्रिया सुळे यांचे पती

16. विपिन शर्मा – ठाणे महापालिका आयुक्त,

17. पंकजा मुंडे – भाजपच्या राष्ट्रीय सचिव

18. एकनाथ शिंदे – नगरविकास मंत्री

19. अरविंद सावंत – शिवसेना खासदार

20. विद्या ठाकूर – भाजप आमदार

21. वरुण सरदेसाई – युवा सेनेचे सरचिटणीस

22. अतुल भातखळकर – भाजप आमदार

23.सुजय विखे पाटील – भाजप खासदार

24. निलय नाईक-भाजप आमदार

25. प्रताप सरनाईक- शिवसेना आमदार

26. प्रवीण दरेकर- भाजपचे आमदार आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते

Maharashtra Corona Crisis BJP leader Praveen Darekar positive, MNS president Raj Thackeray’s staff also infected; So far 13 ministers, 70 MLAs have been infected

महत्त्वाच्या बातम्या

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात