प्रतिनिधी
मुंबई – राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्यासाठी काँग्रेसचे नेते भेटले असले, तरी भाजप त्यासाठी सौदेबाजी करणार नाही. १२ आमदारांच्या निलंबनाचा विषय देखील त्या चर्चेत आलेला नाही. ही काही जणांची पतंगबाजी सुरू आहे, अशा स्पष्ट शब्दांत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांना सुनावले. Maharashtra Congress president Nana Patole and CLP leader Balasaheb Thorat met Leader of Opposition Devendra Fadnavis at his official residence in Mumbai, over upcoming Rajya Sabha bypolls
राजीव सातव यांच्या निधनानंतर राज्यसभा सदस्यपदाच्या जागेसाठी पोटनिवडणूक होत असून त्यासाठी काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यासाठी आज रजनी पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
तर, भाजपने या निवडणुकीसाठी उमेदवार उभा करणार असल्याचे सांगितले आहेच. त्यामुळे बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी आज देवेंद्र फडणवीस यांची सागर निवासस्थानी भेट घेत राज्यसभा निवडणूक बिनविरोध करण्याची विनंती केली.
Maharashtra Congress president Nana Patole and CLP leader Balasaheb Thorat met Leader of Opposition Devendra Fadnavis at his official residence in Mumbai, over upcoming Rajya Sabha bypolls pic.twitter.com/71Yqw1C7Ye — ANI (@ANI) September 23, 2021
Maharashtra Congress president Nana Patole and CLP leader Balasaheb Thorat met Leader of Opposition Devendra Fadnavis at his official residence in Mumbai, over upcoming Rajya Sabha bypolls pic.twitter.com/71Yqw1C7Ye
— ANI (@ANI) September 23, 2021
क्रांतीसिंह नाना पाटलांच्या कन्या क्रांतीवीरांगना हौसाताई पाटील यांचे कराडमध्ये निधन
या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस म्हणाले, की आज बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले यांनी माझी भेट घेतली. त्यांनी मला राज्यसभेची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी विनंती केली आहे. याबाबत कोअर कमेटी, प्रदेशाध्यक्ष या सगळ्यांशी चर्चा करु नंतर निर्णय घेऊ, असे मी त्यांना सांगितले आहे. यामध्ये १२ आमदारांचा विषय झाला नाही. भाजपा सौदेबाजी करत नाही.
काही जणांना अलीकडच्या काळामध्ये पतंग उडवायची सवय झाली आहे. त्यामुळे (१२ आमदारांचा विषय) त्यांनी उडवलेले पतंग आहेत. आमचे १२ आमदारांना निलंबित केले आहे, ते नियमबाह्य आहे. त्या संदर्भात आम्ही न्यायालयात लढा देत आहोत. त्यासाठी सौदेबाजी करायची आम्हाला गरज नाही.
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App