Maharashtra Budget : ‘शक्तिपीठ’ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटींच्या निधीची अर्थसंकल्पात घोषणा

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला अर्थसंकल्प मांडला. यामध्ये शेतकरी, महिला, आदीवासी, मागासवर्ग आदींच्या विकासासोबतच राज्यातील महत्वपूर्ण प्रकल्प, स्मारक, तीर्थस्थळांबरोबरच शक्तिपीठ महामार्गासाठी भरसाठ निधी जाहीर करण्यात आला. महराष्ट्रातील शक्तिपीठ महामार्गासाठी तब्बल ८६ हजार ३०० कोटींचा निधी देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. यासोबत राज्यभरातील अन्य रस्त्यांच्या निधीबाबत फडणवीसांनी केलेल्या घोषणा पाहूयात – Maharashtra Budget 86 thousand 300 crore fund announced in the budget for Shaktipeth Highway in Maharashtra


Maharashtra Budget : शिंदे-फडणवीस सरकारच्या पहिल्या अर्थसंकल्पात महापुरुषांच्या स्मारकांसाठीही भरघोस निधी जाहीर


– हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा विस्तार, सिंदखेडराजा नोड ते शेगावपर्यंत चौपदरी रस्ता केला जाणार

– पवनार (वर्धा) ते पात्रादेवी (सिंधुदुर्ग) महाराष्ट्र शक्तिपीठ महामार्गासाठी ८६ हजार ३०० कोटी रुपये (नागपूर-गोवा) जाहीर करण्यात आले आहेत. या महामार्गाद्वारे माहूर, तुळजापूर, कोल्हापूर, अंबेजोगाई ही शक्तीपीठे, औंढा नागनाथ, परळी वैजनाथ ही दोन ज्योर्तिलिंग, नांदेड गुरुद्वारा, पंढरपूर, कारंजा लाड, अक्कलकोट, गाणगापूर, नरसोबाची वाडी, औदुंबर जोडले जाणार आहेत.  या महामार्गाचा हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग जिल्ह्यांना लाभ होणार आहे.

रस्त्यांसाठी निधी –

– पुणे रिंगरोडसाठी भरीव निधीची तरतूद

– मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या कामासाठी निधी

– विरार-अलिबाग मार्गासाठी निधीची तरतूद

– रायगड जिल्ह्यातील रेवस ते रेड्डी, सिंधुदुर्ग सागरी महामार्गासाठी निधी

– हायब्रीड अ‍ॅन्युईटीतून 7500 कि.मी.चे रस्ते/90,000 कोटी रुपये

– आशियाई बँक प्रकल्पातून 468 कि.मी.चे रस्ते/4000 कोटी रुपये

– रस्ते व पुलांसाठी 14,225 कोटी रुपये, यातून 10,125 कि.मी.चे कामे, 203 पूल व मोर्‍यांची कामे

– जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग : 4500 कि.मी./3000 कोटी रुपये

– प्रधानमंत्री ग्रामसडक योजना : 6500 कि.मी.

– मातोश्री ग्रामसमृद्धी पाणंद शेतरस्त्यांसाठी नवी योजना

– सीमावर्ती भागातील गावांमध्ये रस्ते, वीज, पाणी, शिक्षण, आरोग्यासाठी योजना

Maharashtra Budget 86 thousand 300 crore fund announced in the budget for Shaktipeth Highway in Maharashtra

महत्वाच्या बातम्या 

Array

LEAVE A COMMENT

To be published, comments must be reviewed by the administrator.*



    दगडी चाल फेम अभिनेत्री पूजा सावंत ने गुपचूप उरकला साखरपुडा. श्रीमंत दगडूशेठ गणपती 2023 ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक पत्नी अक्षता मूर्तीसह अक्षरधाम मंदिरात