Remdesivir Injection : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा केंद्राशी वाद सुरू आहे. तर राज्याच्या संस्थांनी जप्त केलेल्या औषधाच्या 5,000 हजार कुप्या कोर्टाच्या परवानगीअभावी वापरात येत नाहीयेत. मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात छापे टाकताना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलीस विभागाने या कुप्या ताब्यात घेतल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. Maharashtra awaits court permission to use confiscated 5000 Vials of Remdesivir Injection
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या पुरवठ्याबाबत राज्य सरकारचा केंद्राशी वाद सुरू आहे. तर राज्याच्या संस्थांनी जप्त केलेल्या औषधाच्या 5,000 हजार कुप्या कोर्टाच्या परवानगीअभावी वापरात येत नाहीयेत. मार्च आणि एप्रिलमध्ये महाराष्ट्राच्या विविध भागात छापे टाकताना अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आणि पोलीस विभागाने या कुप्या ताब्यात घेतल्या असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.
एफडीएच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, छापेमारीच्या वेळी रेमडेसिव्हिरच्या 5 हजार कुप्या ताब्यात घेण्यात आल्या. परंतु आम्ही त्या वापरासाठी देऊ शकत नाही कारण केवळ न्यायालय याची परवानगी देऊ शकते.” ते म्हणाले, “जप्तीनंतर आम्हाला पुरावे गोळा करावे लागतात, आरोप निश्चित करावे लागतात आणि जप्त केलेला मुद्देमाल कोर्टापुढे सादर करावा लागतो. खटला जिंकण्यासाठी राज्याचा युक्तिवाद मजबूत असावा लागतो. केवळ तेव्हाच या कुप्या कोविड रुग्णांसाठी वापरल्या जाऊ शकतात.”
यासंदर्भात विचारले असता एका आरोग्य अधिकाऱ्याने सांगितले की, संसर्गाच्या विशिष्ट कालावधीत रेमडेसिव्हिरचा वापर करावा लागतो. आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, देशाच्या इतर भागातही कोरोना विषाणूचे प्रमाण वाढत असल्याने केंद्र राज्याचा कोटा वाढवण्याची शक्यता नाही. तथापि, नुकत्याच केंद्राने जाहीर केलेल्या वाटपानुसार 21 एप्रिल ते 30 एप्रिल या दहा दिवसांकरिता एकूण 16 लाख इंजेक्शनपैकी महाराष्ट्राच्या वाट्याला 4 लाख 35 हजार इंजेक्शन आल्याचे स्पष्ट झाले आहे.
Maharashtra awaits court permission to use confiscated 5000 Vials of Remdesivir Injection
महत्त्वाच्या बातम्या
To be published, comments must be reviewed by the administrator.*
Our website uses cookies to improve your experience. Learn more
Download App